Houses in Pune| पुण्यात गतवर्षी 53टक्के घरांची विक्री ; ‘या’ सुविधांमुळे शहरात घर खरेदीला मिळतेय प्राधान्य

Houses in Pune| पुण्यात गतवर्षी 53टक्के घरांची विक्री ; 'या' सुविधांमुळे शहरात घर खरेदीला मिळतेय प्राधान्य
सांकेतिक फोटो

नागरिकांचा  नोकरी, व्यवसाय , उद्योगांच्या निमित्ताने आयुष्यातला बराच काळ वेगवेगळया शहारत व्यतीत होते. मात्र निवृत्तीनंतर निवांत , सर्वसुविधानी युक्त शहर म्हणून अनेक नागरिक पुणे शहराची निवड करत आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 03, 2022 | 12:58 PM

पुणे – मुंबई पाठोपाठ पुणे शहराचा अत्यंत झपाट्याने होत असलेला विकास , मेट्रोसारख्या वेगवान वाहतुकीच्या सुविधा या सगळ्यामुळे पुण्यात घर घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. गतवर्षी पुण्यात जवळपास घरांच्या विक्रीमध्ये तब्बल 53 टक्के वाढ झाली आहे. एनारॉक स्थित कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात  माहितीसमोर आली आहे. एनारॉक कंपनी देशातील सार्वधिक घरांची विक्री केलेल्या सात शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पुण्यात घर खरेदीचा सहा क्रमांक लागत आहे. मुंबईमध्ये 72  टक्के घरांची विक्री झाली आहे.

2020 वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये अधिक वाढ

दिवसेंदिवस पुणे महानगरपालिकेचा विस्तार वाढत आहे इतकंच नव्हेतर, महापालिकेत नव्यानं समाविष्ठ झालेल्या 23  गावांमुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठी महानगरपालिका झाली आहे. पुणे शहरात घर घेण्यसाकडं नागरिकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात 2020या वर्षात विकलेल्या घराची संख्या 23हजार 460  इतकी होती. यामध्ये वाढत होत गतवर्षी 2021 मध्ये शहरात तब्बल 35 हजार 980घरांची विक्री झाली आहे.

सेंकड इनिंगसाठी पुण्याची निवड

नागरिकांचा  नोकरी, व्यवसाय , उद्योगांच्या निमित्ताने आयुष्यातला बराच काळ वेगवेगळया शहारत व्यतीत होते. मात्र निवृत्तीनंतर निवांत , सर्वसुविधानी युक्त शहर म्हणून अनेक नागरिक पुणे शहराची निवड करत आहेत. त्यामुळे निवृत्तीनंतर पुण्यात वास्तव्य करण्यास प्राधनय दिले जात आहे. यासाठी बऱ्याच नोकरीत कार्यरत असतानाच घराच्या खरेदीसाठी गुंतवणूक करण्यावर भर दिला जात आहे.

पुण्यात घर खरेदीची ही मुख्य करणे

  • – मुलांच्या शिक्षणासाथीच्या सर्व सुज्ज सोयी सुविधा उपलब्ध.
  • शहरातील वातावरण आरोग्यादायी आहे.
  • शहराचा विकास होत असल्याने वाहतुकच्या विविध सुविधा निर्माण होत आहे.
  • देशभरातील इतर शहरांना जोडण्यासाठी उत्तम कनेटिव्हीटी पुण्यात उपलब्ध आहे.
  • नोकरी, उद्योगांची या उपलब्धता येथे आहे.

15 ते 18 वयोगटातील मुलेच भरपूर फिरणारी, लसीकरणाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या

Mahadev Jankar | महादेव जानकरांनी दंड थोपटले, आगामी लोकसभा निवडणूक परभणीतून लढवणार

Viral : ऐकावे ते नवलच…! चक्क पिटुकल्या माऊचे डोहाळे जेवण, पाहा क्युट फोटो

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें