Bulk cart race | भिर्रर्र चा नाद घुमणार ; जिल्हाधिकारी कार्यालयात 703 बैलगाडा मालकांनी केली नोंदणी ; घाट दुरुस्तीचे कामही सुरु

Bulk cart race | भिर्रर्र चा नाद घुमणार ; जिल्हाधिकारी कार्यालयात 703 बैलगाडा मालकांनी केली नोंदणी ; घाट दुरुस्तीचे कामही सुरु
Bailgada-Race

योजनासाठी गाडा मालक आता जिल्हाधिकारी कार्यालयात नाव नोंदणी करत आहेत. शर्यतीच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत 703 बैलगाडा मालकांनी नाव नोंदणी केली आहे. इतक्या मोठ्या संख्येने नाव नोंदणी होत असल्याने लकी ड्रॉ पद्धतीने हे टोकन काढण्यात येत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 31, 2021 | 10:25 AM

पुणे- बैलगाड्याच्या शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने नियम व अटी घालून सशर्त परवानगी दिल्याने बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील पहिली बैलगाडा शर्यत आंबेगाव तालुक्यामधील लांडेवाडी येथे उद्या (1जानेवारी) रोजी होणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करून हे शर्यत भरवण्यात येणार आहे. लसीचे दोन डोसपूर्ण झालेलया लोकांनाच शर्यतीच्या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.

शर्यतीच्या नानावनोंदणीसाठी गर्दी

भिर्रर्र ला… च्या आयोजनासाठी गाडा मालक आता जिल्हाधिकारी कार्यालयात नाव नोंदणी करत आहेत. शर्यतीच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत 703 बैलगाडा मालकांनी नाव नोंदणी केली आहे. इतक्या मोठ्या संख्येने नाव नोंदणी होत असल्याने लकी ड्रॉ पद्धतीने हे टोकन काढण्यात येत आहे.

शर्यतीसाठी घाटांची होतेय डागडुजी

बैलगाडा शर्यतींवरती बंदी असल्याने मागली काही वर्षांपासून शर्यती होणाऱ्या घाटांची काहीशी दुरावस्था झाली होती. मात्र शर्यतीला परवानगी मिळल्यानंतर घाटांच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. बैलगाडा शर्यतीसाठी जिल्ह्यातील काही घाट प्रसिद्ध आहे.

टाकवे बुद्रुकचा घाट मावळ तालुका बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आघाडीवर असलेला तालुका आहे. या तालुक्यातील टाकवे गावात ४०० फुट धावपट्टी असलेल्या घाट असून 2009 मध्ये याची निर्मिती करण्यात आहे. या घाटाचीही दुरुस्तीचे काम सुरु आहे.

देहूचा बैलगाडा घाट देहूगाव- . देहूगाव येथे तीन साडे तीन वर्षांपुर्वी बैलगाडा आदर्श बैलगाडा शर्यंतींसाठी घाट आमदार सुनिल शेळके यांच्या सहकार्याने सुमारे चार ते पाच लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला. हा घाटही शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे. या घाटात देहूगावसह माळीनगर, विठ्ठलनगर, खेड तालुक्यातील येलवाडी, सांगुर्डी, कान्हेवाडी, खालुंब्रे, मावळ तालुक्यातील सुदवडी, सुदुंबरे, सोमाटणे फाटा या गावातील बैलगाडा मालक येथे बैलांना सरावासाठी घेवून येत आहेत. येथे दोन बैलांची छकडी, चार बैल व घोडा यांचा बैलगाडा अशा दोन प्रकारांमध्ये येथे सराव चालतो.

घाटांमध्ये आहेत या सुविधा

  • बैलबांधण्यासाठी लोखंडी कठडे उभारण्यात आल्या आहेत.
  • घाटा पासून जवळच बैलांना वाहनांमधुन उतरवण्यासाठी ठिकठिकाणी मातीचे रॅम्प बनविण्यात आले आहेत.
  • अवघ्या शंभर मीटर अंतरावर बैलांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व बैलांना धुण्यासाठी व पोहण्यासाठी नैसर्गिक पाझर तलावची निर्मिती.
  • शर्य़तीच्या बैल लांब जावू नयेत यासाठी घाटाच्या शेवटी मुरमाचे कठडे उभारून गोल आळे तयार करण्यात आले आहे. यामुळे बैलांना कोणताही धोका होत नाही.
  • स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बैलगाडा दिसावा यासाठी घाटाच्या दोन्ही बाजूला दगडी बांधकाम करण्यात आलेले आहे.

धक्कादायक! सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर पुण्यात जमावाचा हल्ला; पोलिसांचा हवेत गोळीबार

Winter Diet : हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!

Nitesh Rane | ‘हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस,’ जागोजागी नितेश राणेंच्या फोटोचे बॅनर, नवा वाद पेटणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें