AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वय लहान, पण बोलणं मनाला भिडणारं, जेजुरी गडावरील चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल, कोण आहे शुभम..

जेजुरी गडावरील एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओत तो लहान मुलगा गडावर येणाऱ्या नवरदेव नवरीला पूजा करायला लावताना दिसला. त्याची बोलण्याची पद्धत सर्वांनाच आवडत आहे.

वय लहान, पण बोलणं मनाला भिडणारं, जेजुरी गडावरील चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल, कोण आहे शुभम..
Jejuri Shubham
| Updated on: Sep 11, 2026 | 9:09 AM
Share

tv9 मराठी प्रतिनिधी, विक्रम वारे :  अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर सध्या एका चिमुकल्या आवाजाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. जेजुरी गडावरील एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओत तो लहान मुलगा गडावर येणाऱ्या नवरदेव नवरीला पूजा करायला लावताना दिसला. यादरम्यान तो जो काही आणि ज्याकाही पद्धतीने बोलत आहे हे पाहून सर्वजण भारावून गेले. या मुलाचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. पूजा करायला लावण्याची त्याची पद्धत तूफान चर्चेत आली. या मुलाचे नाव शुभम वाघरी असून त्याची राज्यभरात चर्चा होत आहे. जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांना, विशेषतः नवविवाहित जोडप्यांना आपल्या खास आवाजात शुभेच्छा देणारा शुभम सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी भाविकांचीही गर्दी होताना पाहायला मिळत आहे.

शुभम हा शाळेत शिक्षण घेतो. मात्र, शाळा सुटल्यानंतर तो जेजुरी गडावर येतो आणि आपल्या आवाजाच्या माध्यमातून भाविकांचे मनोरंजन करत सेवा बजावतो. त्याच्या बोलण्यातील खास शैली आणि आवाजामुळे काही भाविकांनी त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आणि पाहता पाहता शुभम सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

या व्हायरल चेहऱ्यामागची परिस्थिती मात्र अत्यंत हलाखीची आहे. शुभमच्या आई-वडिलांकडून सेंट्रींगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही शुभम शिक्षण घेत आहे आणि मिळेल त्या वेळेत जेजुरी गडावर सेवा करत आहे. तो तेथील नारळ गोळा करतो. मिळेल ती सेवा करतो आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आकर्षिक करतो.

मिळेल ते पैसे घेऊन तो घरी परततो. त्याची लहान भावंडे देखील आहेत. शुभम याने स्पष्ट केले की, तो गडावर शाळेतून आल्यावर जातो. त्यानंतर तो पूजा, गाणे म्हणत लोकांचे मनोरंजन करतो. त्यानंतर ते काही पैसे मिळतात, त्यातून त्याचे घर चालते. शुभम सध्या सोशल मीडियावर तूफान चर्चेचा विषय ठरलाय.

Follow Us
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...