प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी 1 हजार कोटींचा निधी, अंमलबजावणीसाठी विशेष सप्ताहाचं आयोजन, असा घ्या लाभ

केंद्र सरकारच्या (Government of India) वतीनं देशभरात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात 1 हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. सोबतच 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान विशेष सप्ताहाचं आयोजनही करण्यात आलं आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी 1 हजार कोटींचा निधी, अंमलबजावणीसाठी विशेष सप्ताहाचं आयोजन, असा घ्या लाभ
प्रधानमंत्री मातृवंदना योजना
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 6:52 PM

पुणे : केंद्र सरकारच्या (Government of India) वतीनं देशभरात प्रधानमंत्री मातृवंदना योजना (Pradhan Mantri Matruvandana Yojana) राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातात. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात 1 हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. सोबतच 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान विशेष सप्ताहाचं आयोजनही करण्यात आलं आहे. यादरम्यान गर्भवती महिला आणि स्तनदा मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केलं आहे. (A special week has been organized for the effective implementation of Pradhan Mantri Matruvandana Yojana)

काय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना?

गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवली जाते. यामागे जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे हा हेतू आहे. सोबतच मातामृत्यू आणि बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा या उद्देशानेही प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविली जाते. महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृवंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

1 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान विशेष सप्ताह

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने दिनांक 1 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान सर्व पात्र लाभार्थींनी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्त्या, एएनएम, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याकडे लाभार्थी आणि तिच्या पतीचे आधारकार्ड, आधार संलग्न बँक, पोस्ट खाते, माताबाल संगोपन कार्ड, बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

101 टक्के लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत पुणे विभागातील पुणे जिल्हयात 89 कोटी 48 लाख 59 हजार रुपये, सातारा जिल्हयात 37 कोटी 14 लाख 42 हजार रुपये तर सोलापूर जिल्हयात 39 कोटी 62 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. 2021-22 या वर्षासाठी लाभार्थी नोंदणीचे पुणे जिल्हयासाठी 2 लाख 6 हजार 420 इतक्या उद्दिष्टापैकी 2 लाख 8 हजार 166 म्हणजे 101 टक्के लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टलवर करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Job Alert | पुण्यात रोजगाराच्या सुवर्णसंधी, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा रोजगार मेळावा, असा करा अर्ज

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून ई-श्रम पोर्टल सुरू, देशातील 38 कोटी मजुरांचा डेटाबेस मिळणार

E-Shram Card: ‘या’ लोकांनी त्यांचे ई-श्रम कार्ड बनवले पाहिजे, अनेक फायदे मिळणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.