Pune : मावळे 17 तास खिंड लढवू शकतात, आपण 12 तास…; पुण्यातल्या जुन्नरमध्ये झाला अनोखा रेकॉर्ड!

17 तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही 12 तास कीर्तन करू शकतो. त्यानंतर ह. भ. प. बाजीराव महाराज बांगर महाराज यांनी सलग बारा तास कीर्तन करण्याचा मनात निश्चय केला.

Pune : मावळे 17 तास खिंड लढवू शकतात, आपण 12 तास...; पुण्यातल्या जुन्नरमध्ये झाला अनोखा रेकॉर्ड!
कीर्तन करताना हभप बाजीराव महाराज बांगर
Image Credit source: tv9
सुनिल थिगळे, प्रतिनिधी

| Edited By: प्रदीप गरड

Jun 16, 2022 | 9:41 AM

जुन्नर, पुणे : विविध विषयांवर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड (World record) आहेत. कीर्तनावर वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे आपण ऐकले नसेल. मात्र आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील प्रसिद्ध कीर्तनकार, शिवचरित्र कथाकार ह. भ. प. बाजीराव महाराज बांगर यांनी नारायणगाव येथे सलग 12 तास 20 मिनिटांचे कीर्तन (Kirtan) करून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये रेकॉर्ड केले आहे. कुठलाही सराव नसताना गेली बारा वर्षापासून कीर्तन सेवा देणारे शिवचरित्र कथाकार ह. भ. प. बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) चरित्रातून प्रेरणा घेत पावनखिंडीच्या लढाईत सतरा तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हीच त्यांची प्रेरणा ठरली. 17 तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही 12 तास कीर्तन करू शकतो. त्यानंतर बांगर महाराज यांनी सलग बारा तास कीर्तन करण्याचा मनात निश्चय केला.

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने सुरुवात

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे प्रमुख पवन सोळंकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया सहभागासाठी हिरवा कंदील दर्शविला. नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, जयहिंद ग्रुपचे सर्वेसर्वा विजय गुंजाळ, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, रमेश भोसले यांच्या सहकार्यातून नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालय तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील तीन चरणांचा अभंग घेत कीर्तनाला प्रारंभ केला. सलग 12 तास 20 मिनिटानंतर कीर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे

हे सुद्धा वाचा

मेडल देऊन सन्मान

12 तास 20 मिनिटांचे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर तुकाराम महाराजांचे दहावे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे वतीने मेडल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच योगेश पाटे, जयहिंद ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, माऊली खंडागळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हभप बाजीराव महाराज बांगर हे शिव शंभू चरित्र कथाकार म्हणून प्रसिद्ध असून कथाकार, कीर्तनकार, प्रबोधनकार, व्याख्याते, अभिनेते आणि लेखक म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान या राज्यात प्रसिद्ध आहेत. या वर्ल्ड रेकॉर्ड इंडियासाठी स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्यचे जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील कार्यकर्त्यांचे तसेच मुक्ताबाई-काळोबा देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें