AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : 1,50,000 नोकरभरती… अजितदादांची मोठी माहिती; कंत्राटी भरतीवरही मोठं विधान

कंत्राटी भरतीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. कंत्राटी भरतीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्यानंतर अखेर कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आला आहे. मात्र, कंत्राटी भरतीचा निर्णय आणि धोरण आमचं नव्हतं. ते मागच्या सरकारचं होतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar : 1,50,000 नोकरभरती... अजितदादांची मोठी माहिती; कंत्राटी भरतीवरही मोठं विधान
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2023 | 9:01 AM
Share

प्रदीम कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 21 ऑक्टोबर 2023 : कंत्राटी भरती अखेर रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पण कंत्राटी भरतीचं पाप आमचं नव्हतं ते पाप तर काँग्रेस सरकारचं होतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या निर्णयानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मुद्द्यावर आज भाष्य केलं. तसेच विरोधकांनी केवळ अपप्रचार केल्याचा दावाही त्यांनी केला.

अजित पवार आज पुण्यात आहेत. पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी घाटावर वृक्षारोपणही केलं. त्यानंतर ते मीडियाशी संवाद साधत होते. कंत्राटी भरतीवर विरोधकांकडून अपप्रचार करण्यात आला. तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या जातील असं सांगितलं गेलं. मात्र वस्तुस्थिती वेगळी होती. कॅबिनेटमध्ये हा विषय आला होता. तेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती मांडतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानुसार त्यांनी वस्तुस्थिती मांडली आहे, असं अजित पवार म्हणाले.

मोठी भरती

आपण दीड लाख नोकर भरती करत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. आता कोणी माफी मागायची आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे, असा टोलाही अजितदादांनी विरोधकांना लगावला आहे.

तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून

तुम्ही झोपेत असता बाकीचे सगळे झोपेत असतात. इतरांना त्रास होवू नये, कामाची पाहणी करता यावी म्हणून मी सकाळी येतो, असंही त्यांनी सांगितलं. नदी सुधार प्रकल्पाच्या कामात दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. पर्यावरणवाद्यांचा पण यामध्ये विचार करण्यात आला आहे. काहीजण कोर्टात गेले होते. मात्र महापालिकेनं बाजू मांडली. अशी कामं आधी इतर ठिकाणी झाली आहेत. अहमदाबादलाही काम झालं आहे. अहमदाबादमधील कामात काही त्रुटी होती का याची पाहणी करून एक टीम आली आहे. झाडं टिकली पाहिजे. कामही चांगली झाली पाहिजे, असं दादा म्हणाले.

एवढी महागडी झाडं…

अजित पवार यांनी यावेळी प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध घेतला. याचा सुगंध खूप भारी येतो, असं अजितदादा म्हणाले. यावेळी त्यांनी या फुलांची किंमतही अधिकाऱ्यांना विचारली. तेव्हा, या फुलांची किंमत 3 हजार रुपये असल्याचं अधिकाऱ्यांनी अजितदादांना सांगितलं. तेव्हा, एवढी महागडी झाडं लावणार का? असा सवाल दादा यांनी करताच एकच खसखस पिकली. यावेळी अजितदादांनी नदी सुधार प्रकल्पाच्या घाटावर वृक्षारोपणही केलं.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.