AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weekend lockdown: केरळ, बंगालमध्येही निवडणुका आहेत, तिथे निर्बंध का नाहीत?; अजितदादांचा सवाल

राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (ajit pawar reaction on Weekend Lockdown In Maharashtra)

Maharashtra Weekend lockdown: केरळ, बंगालमध्येही निवडणुका आहेत, तिथे निर्बंध का नाहीत?; अजितदादांचा सवाल
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
| Updated on: Apr 04, 2021 | 6:18 PM
Share

पुणे: राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच वीकेंड लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीला हे निर्बंध लागू असतील काय? असा सवाल करण्यात आला. त्यावर केरळ, बंगालमध्येही निवडणुका आहेत. तिथे निर्बंध नाहीत का? असा सवाल लोक विचारत आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. (ajit pawar reaction on Weekend Lockdown In Maharashtra)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत कोरोनाचे निर्बंध लागू होणार नाहीत का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा केंद्र सरकारनेच पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक लावली आहे. त्यामुळे ते क्षेत्र अपवाद आहे. बंगाल, केरळातही निवडणुका होत आहेत. तिथे निर्बंध का नाहीत? असा सवाल केला जात आहे. पण नियम पाळून प्रचार करण्यात येत आहे. पंढरपुरातही नियम पाळून प्रचार केला जाईल, असं अजित पवार म्हणाले.

आतली चर्चा बाहेर नको

भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या समोर बैठकीत लॉकडाऊनबाबतचे निर्णय घेण्यात आले. अनेक विषयावर चर्चा झाली. आतली चर्चा बाहेर करायची नसते. पण सर्वांनी चर्चा करूनच निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले. लॉकडाऊन कुणालाही नको आहे. पण लोकं ऐकत नाहीत. त्यामुळे पर्यायच उरला नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सल्ला दिल्यानेच हा निर्णय घ्यावा लागेल, असं ते म्हणाले.

आताची लाट वेगळी

पुण्यात ज्यापद्धतीने निर्बंध लागू करण्यात आलेत, तसेच निर्बंध लागू करण्याची सर्वांची मागणी आहे. त्याबाबत उद्या रात्री 8 वाजता निर्णय होईल. आताची लाट वेगळी आहे. पूर्वी एक व्यक्ती बाधित झाल्यानंतर तोच किंवा त्यांच्या संपर्कातील एक दोन जण बाधित व्हायचे. आता एक व्यक्ती बाधित झाल्यानंतर त्याचं संपूर्ण कुटुंब बाधित होतं, असं ते म्हणाले. रुग्णाला ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राजकारण करू नका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना लॉकडाऊनच्या निर्णयात राजकारण आणू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही. परंतु, तसा काही निर्णय घेतला तर दोन दिवस आधी सांगितलं जाईल. त्यामुळे कुणाचीही गैरसोय होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. (ajit pawar reaction on Weekend Lockdown In Maharashtra)

संबंधित बातम्या:

Maharashtra Weekend lockdown: राज्यात वीकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?

Maharashtra Lockdown : संपूर्ण महाराष्ट्रात ‘मिनी लॉकडाऊन’, काय बंद, काय सुरु राहणार?

(ajit pawar reaction on Weekend Lockdown In Maharashtra)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.