AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Loudspeaker : स्वागतार्ह..! ईदच्या दिवशी डीजे टाळून तो पैसा गरजूंसाठी वापरणार; पुण्याच्या लोहिया नगरमधल्या मशिदींचा निर्णय

पुण्यातील पाच मशिदींच्या अधिकाऱ्यांनी आणि येथील काही ज्येष्ठ मुस्लीम समुदायाच्या सदस्यांनी आगामी ईदच्या उत्सवादरम्यान डीजे (DJ) टाळण्याचा निर्णय घेतला आहे. तोच पैसा गरजू, गरीब लोकांसाठी वापरला जाणार आहे.

Pune Loudspeaker : स्वागतार्ह..! ईदच्या दिवशी डीजे टाळून तो पैसा गरजूंसाठी वापरणार; पुण्याच्या लोहिया नगरमधल्या मशिदींचा निर्णय
मशिद आणि लाउडस्पीकर (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
| Updated on: Apr 28, 2022 | 7:30 AM
Share

पुणे : धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या (Loudspeaker) वापरावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पाच मशिदींच्या अधिकाऱ्यांनी आणि येथील काही ज्येष्ठ मुस्लीम समुदायाच्या सदस्यांनी आगामी ईदच्या उत्सवादरम्यान डीजे (DJ) टाळण्याचा आणि त्यासाठी जमा झालेला निधी गरजू आणि गरिबांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी समाजातील तरुणांना 2 मे रोजी ईद-उल-फित्र उत्सवादरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजवू नये, असे आवाहन केले आहे. अशा मोठ्या आवाजातील डीजेचे दुष्परिणाम सर्वांनाच ठाऊक आहेत. आजारी असणाऱ्यांसाठी तसेच हृदयाची समस्या असणाऱ्यांसाठी हे चांगले नाही, असे मत पुण्यातील (Pune) प्रमुख मशिदींच्या ज्येष्ठ सदस्यांचे आहे. म्हणूनच परिसरातील पाच मशिदींची एक कोअर कमिटी तयार केली आणि त्यांच्या इमाम आणि कार्यकर्त्यांची तसेच समाजातील इतर वरिष्ठ सदस्यांची बैठक घेतली आणि ईदच्या उत्सवादरम्यान डीजे न लावण्याचा निर्णय घेतला, असे लोहिया नगर भागातील मशिदीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मार्गदर्शक तत्वांचे पालन

उत्सवादरम्यान डीजे सिस्टीम खरेदी करण्यासाठी जमा होणारा निधी परिसरातील गरजू आणि गरीब लोकांना मदत करण्यासाठी वापरला जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या वापराबाबतही नियम आखण्यात आला आहे. परिसरातील पाचही मशिदी ध्वनी प्रदूषणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात आणि अझानच्या दरम्यान आवाज नेहमीच कमी ठेवला जातो, असेही मशिदीतर्फे सांगण्यात आले आहे.

नमाजादरम्यान होत आहे समुपदेशन

या भागात संमिश्र लोकवस्ती आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत हिंदू समुदायातील कोणीही ‘अझान’ वाजविल्यामुळे कोणताही त्रास झाल्याची तक्रार केलेली नाही. येथील समुदाय सर्व सण एकोप्याने साजरे करतात, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. नमाजादरम्यान समाजातील लोकांना या निर्णयाची माहिती दिली जात आहे. या समुपदेशनाचा फायदा होत असून सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निर्णयाचे शहराच्या इतर भागातही अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा :

Loudspeaker : सत्ताधारी अन् विरोधकांनी भोंग्यावरून समाजात तेढ निर्माण करणं थांबबावं, अन्यथा…; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पुण्यात इशारा

Pune accident CCTV : बापरे..! काळजाचा थरकाप उडवणारा Video; अंगावरूनच घातली गाडी, व्यावसायिकावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणार, पुणे पालिकेचा दावा; मात्र आतापर्यंत नाले अन् पावसाळी गटारांची झालीय अवघी 8 टक्केच स्वच्छता

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.