AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनचा फॉर्म ऑगस्टमध्ये भरल्यावर जुलैच्या पैशांचं काय होणार?, अजितदादांची मोठी घोषणा काय?

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : आज बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'लाडकी बहीण योजने'वर भाष्य केलं आहे. त्यांनी महिलावर्गाला आश्वस्त केलं आहे. फॉर्म भरण्यास उशीर झाला तरी घाबरण्याचं कारण नाही, असं अजित पवार म्हणालेत. वाचा सविस्तर...

लाडकी बहीण योजनचा फॉर्म ऑगस्टमध्ये भरल्यावर जुलैच्या पैशांचं काय होणार?, अजितदादांची मोठी घोषणा काय?
लाडकी बहीण योजनेवर अजित पवारांचं भाष्यImage Credit source: Facebook
| Updated on: Jul 15, 2024 | 1:56 PM
Share

बारामतीत आज ‘जन सन्मान रॅली’ होत आहे. या रॅलीवेळी अजित पवार यांनी महिलांवर्गाची भेटी घेतली. त्यांना ‘लाडकी बहीण योजने’बाबत जागृत केलं. या योजनेला अधिकाधिका महिलांनी लाभ घ्यावा, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं. ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होत आहे. फॉर्म भरण्यासाठी रांगा लागल्याचं दिसत आहे. याबाबतही अजित पवार यांनी महिलांना आश्वस्त केलं आहे. फॉर्म भरायला उशीर झाला तरी घाबरू नका. एकाद्या भगिनीने ऑगस्टमध्ये जरी ‘लाडकी बहीण योजने’चा फॉर्म भरला तरी जुलै महिन्याने दीड हजार रुपये या महिलांना ऑगस्टमध्ये दिले जातील, असं अजित पवार म्हणालेत.

लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले?

अजित पवार यांनी ‘जन सन्मान रॅली’ला संबोधित केलं. मी जसा राज्याचा विचार केला. तसंच विचार मी बारामतीचा देखील विचार केला. 180 कोटी बारामती मध्ये मिळणार आहेत. लाडकी बहिण योजने मधून पैसे मिळतील. 46 हजार कोटी रुपये राज्याला मिळणार आहे. माझी महिला सक्षम व्हावी, आत्मनिर्भर व्हावी. हेच सरकारचं धोरण आहे, असं अजित पवार म्हणाले.

विधानसभेला महायुतीला निवडून द्यायचं आहेत. हौसे, नवसे, गसे येतील पण हा अजित दादा शब्द देणारा आहे. आम्ही खोटं बोलणार नाही, सत्ता येते सत्ता जाते. ताम्र पाठ घेऊन कोणी आलेलं नाही. सत्तेचा वापर गरिबांसाठी झाला पाहिजे. काल अमितभाई शाह यांना भेटलो. त्यांना साखरेच्या संदर्भात बोललो. एमएसपी वाढवला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

वरुणराजा सुद्धा आपल्यासोबत आहे. जन सन्मान मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा, तालुका ढवळून काढायचा आहे. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही, विकासाचे ध्येय ठेऊन पुढे जायचं आहे. मला बारामती बघत बघत इतर तालुके, पुणे, महाराष्ट्र फिरायचा आहे. इथल्या लोकांनी जबाबदारी पाळायची आहे. घटनेला, संविधान याला कोणी ही धक्का लावणार नाही. चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावणार नाही. आज आमच्याकडून चुका झाल्या, मोठा मंडप टाकायला हवा होता, काळजी करू नका, त्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करू. शिवाजी गर्जे आणि विटेकर यांचंही अभिनंदन करतो, असं अजित पवार म्हणाले.

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.