Baramati Vidhan Sabha: बारामती कोणत्या पवारांची?, विधानसभा निवडणुकीत होणार फैसला? पुन्हा कुटुंबातच सामना रंगणार?
baramati assembly constituency: पुणे जिल्ह्यातील या 21 मधून सर्वांचे लक्ष पुन्हा बारामती या विधानसभा मतदार संघावर असणार आहे. हा मतदार संघ आता अजित पवार यांचे राजकीय भविष्य निश्चित करणार आहे. लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत अजित पवार विधानसभेत पुनरागमन करणार का?

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. राजकीय पक्षांच्या बैठका आणि सर्व्हे सुरु आहेत. उमेदवार ठरवले जात आहेत. युती अन् आघाड्यांमध्ये जागा वाटप सुरु आहे. आता राजकीय तज्ज्ञांचे नव्हे तर सर्वांचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. बारामती पवार कुटुंबियांमुळे देशात अन् राज्यात चर्चेत असलेले शहर आहे. बारामतीचे राजकारण पवार कुटुंबियांभोवती फिरत असते. आधी शरद पवार त्यानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा अन् विधानसभेचे मैदान मारले. अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर एकदा खासदार आणि आतापर्यंत सातवेळा आमदार बारामतीमधूनच झाले. मागील वर्षी अजित पवार यांनी वेगळी वाट निवडली. शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेशी वेगळी भूमिका घेत महायुतीची साथ घेतली. त्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगू लागला. लोकसभा निवडणुकीत हा सामना दिसला. आता विधानसभा निवडणुकीत हाच सामना दिसणार आहे. ...
