AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात अंत्ययात्रेदरम्यान घडलं भयंकर; पार्थिवाला मुखाग्नी देतानाच सगळे सैरावैरा पळाले, व्हिडिओ व्हायरल

pune news ; पुण्यातील आंबेगावातील एका गावात मधमाशांनी अंत्यसंस्काराला आलेल्यांवर हल्ला केला आहे. मधमांशांनी हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली.

पुण्यात अंत्ययात्रेदरम्यान घडलं भयंकर; पार्थिवाला मुखाग्नी देतानाच सगळे सैरावैरा पळाले, व्हिडिओ व्हायरल
| Updated on: Aug 03, 2026 | 11:09 AM
Share

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. आंबेगावच्या वडगाव पीरमध्ये अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यांमुळे अंत्ययात्रेतील उपस्थितांनी स्मशानभूमीतून पळ काढला. या प्रकारामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. या दुर्घटन काही नातेवाईक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आंबेगावच्या वडगाव पीरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गावात  अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर काही जण मृतदेह जागेवर ठेवून स्मशानभूमीतून पळ काढला.

आंबेगावातील वडगावर पीरच्या स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असतानाच ही घटना घडली. मधमाशांच्या या हल्ल्यामुले उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण निर्णाण झालं. नागरिकांना जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळावे लागले. त्यावेळी नातेवाईकांनी मृतदेह जागेवरच ठेवून पळ काढला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु स्मशानभूमीत अनेक उपस्थितांवर मधमाशांनी दंश केला. त्याचबरोबर जखमींवर तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी जखमींवर उपचार केल्यानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

पुण्यातील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्मशानभूमीत एक प्रेत दिसत आहे. या प्रेताच्या आजूबाजूला कोणी दिसत नाही. काही जण मृतदेहाजवळ बसून स्वत:चा बचाव करत आहे. या घटनेदरम्यान एकाने ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. काही नातेवाईकांनी स्मशानभूमीपासून दूरवर पळ काढल्याचे दिसत आहे.

मधमाशांनी हल्ला केल्यानंतर काय करावे?

खरंतर मधमाशा कधीही प्रथम हल्ला करत नाही. तुमच्या डोक्यावर मधमाशा घोंगाऊ लागल्यास तर त्या हल्ला करणार नाहीत, हे गृहीत धरून सावध राहावे. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढावा. मधमाशा हल्ला करतात, त्यावेळी त्यांची संख्या शेकडोंनी असते.त्यावेळी तुम्ही मधमाशांचा मुकाबला करू शकत नाही. पहिली पायरी म्हणजे ताबडतोब सुरक्षित स्थळी पळून जावे. घटनास्थळावरून पळून जाणेच हा चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.

Follow Us
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण?
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण? बड्या नेत्याची पोस्ट चर्चेत
2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी
Shivsena | 2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी खास रणनीती काय?
हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल
हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल, थेट संसदेत...
जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना...
जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना... संजय राऊतांचा मोदींवर थेट प्रहार
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! नेमका मसला काय?
भाजपच्या मित्रपक्षाचाच भाजपला घरचा आहेर! रस्त्यांवरील खड्ड्यांपासून पालकमंत्रीपदापर्यंत...नेमका मसला काय?
मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
Mumbai Water Cut Update | मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच