AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!

पुण्यातील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची चर्चा रंगलेली असतानाच आता भाजपच्या एका बड्या आमदाराला प्रवेश देऊन भाजपला कात्रजचा घाट दाखवण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. (BJP leader will soon join NCP)

भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!
| Updated on: Jan 23, 2021 | 1:36 PM
Share

पुणे: पुण्यातील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची चर्चा रंगलेली असतानाच आता भाजपच्या एका बड्या आमदाराला प्रवेश देऊन भाजपला कात्रजचा घाट दाखवण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. भाजपच्या या बड्या माजी आमदाराने राष्ट्रवादीत घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत खलबतं केल्याची माहिती आहे. त्यामुळे हा भाजपचा माजी आमदार कोण? याबाबत पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे. (BJP leader will soon join NCP)

भाजपच्या या माजी आमदाराने ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये जाऊन फारसा फायदा झाला नसल्याचं जाणवल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र, अजित पवारांनी या माजी आमदाराला पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांकडे सोपवला आहे. या माजी आमदाराने पक्षात प्रवेश केल्यास त्याचा राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, हा माजी आमदार कधी आणि केव्हा पक्षात प्रवेश करणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. तसेच या माजी आमदाराचे नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने हा आमदार कोण? याबद्दल पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

पालिकेची जय्यत तयारी

या आधी भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती. ही चर्चा थांबते न् थांबते तोच आता ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदाराला पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला अस्मान दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. (BJP leader will soon join NCP)

संबंधित बातम्या:

रेणू शर्मांवर राजकीय दबाव, काही लोकांनी तक्रार करायला लावली; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

‘शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी शक्य ते सर्व करु’, भाजपचे प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला

काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची; परस्परांवर पातळी सोडून टीका

(BJP leader will soon join NCP)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.