…तर आम्हीच रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर्सना सुजय विखे पाटलांचा नंबर दिला असता; जयंत पाटलांचा टोला

हा प्रकार अतिश्य गंभीर आहे. औरंगाबाद उच्च न्यायालायने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. | Jayant Patil Sujay Vikhe Patil

...तर आम्हीच रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर्सना सुजय विखे पाटलांचा नंबर दिला असता; जयंत पाटलांचा टोला
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 2:19 PM

पुणे: आम्हाला आधी कळालं असतं तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांचाच नंबर दिला असता, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला. हा प्रकार अतिश्य गंभीर आहे. औरंगाबाद उच्च न्यायालायने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधी इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यात अडथळे येतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले. (NCP leader slams BJP MP Sujay Vikhe Patil over remdesivir injection purchase controversy)

ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुजय विखे-पाटील यांच्याकडून करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वादग्रस्त खरेदीवर भाष्य करण्यात आले. आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही रेमडेविसिरची गरज असलेले रुग्ण आणि डॉक्टरांना सुजय विखेंचा नंबर दिला असता. मात्र, अशाप्रकारे राजकीय हेतूने काम करणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पुण्यात बसून नगरची मापं काढू नका: जयंत पाटील

कोरोनाच्या संकटकाळात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नगर जिल्ह्याकडे लक्ष नाही, हा आरोप जयंत पाटील यांनी फेटाळून लावला. चंद्रकांत पाटील बोलतात त्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. हसन मुश्रीफ नगर जिल्ह्यावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पुण्यात बसून नगरची मापं काढण्याचा प्रकार सर्वांनीच बंद करावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

तर अजित पवार यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. ते सर्व जिल्ह्यांवर नजर ठेवून आहेत. कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पुण्यात येऊन निवडणूक लढले, ते निवडूनही आले. त्यामुळे आता आपण पुण्यासाठी काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी ते अजि पवार यांच्यावर टीका करत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.

‘नगरबाहेरच्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही’

दिल्लीतून नगर जिल्ह्यासाठी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन (remdesivir injection) घेऊन आल्यामुळे वादात सापडलेले भाजप खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) आता प्रतिस्पर्ध्यांविरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. या संपूर्ण प्रकरणात मी नगर जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बांधील नाही. जनतेने निवडून दिलेल्यान नगरमधील कोणत्याही लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्यांना सर्व पुरावे देईन, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले. संबंधित बातम्या:

आनंदाची बातमी! राज्यातील कोरोनाची लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसरणार; टास्क फोर्सचा अंदाज

सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम, दिल्लीवरुन विशेष विमानाने इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये

नगरबाहेरच्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही, रेमडेसिव्हीर वादावर सुजय विखे-पाटलांनी दंड थोपटले

(NCP leader slams BJP MP Sujay Vikhe Patil over remdesivir injection purchase controversy)

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.