Pune rain : कठडे नसलेल्या पुलावरून जाताना वाहून गेला, स्थानिकांनी वाचवलं; कॅमेऱ्यात कैद झालं जुन्नरमधलं काटा आणणारं दृश्यं

एकनाथ बबन रेंगडे असे या घटनेत बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

Pune rain : कठडे नसलेल्या पुलावरून जाताना वाहून गेला, स्थानिकांनी वाचवलं; कॅमेऱ्यात कैद झालं जुन्नरमधलं काटा आणणारं दृश्यं
कठडे नसलेल्या पुलावरून वाहून जात असताना तरूणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 8:26 PM

जुन्नर, पुणे : ओढ्याच्या पुलावरून एक व्यक्ती पाण्यात गेली वाहून गेल्याची (Carried away) धक्कादायक घटना पुण्यातील जुन्नरमध्ये घडली. सुदैवाने या व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे. पुलाला कठडे नसल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. जुन्नर तालुक्यातील गोद्रे (Godre in Junnar) येथे हा प्रकार घडला आहे. जुन्नर तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच ही व्यक्ती पुलाजवळून जात होती. मात्र या पुलाला कठडे नसल्याने अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. त्यात ही व्यक्ती अक्षरश: वाहून गेली. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद (Video) झाले आहे. या व्यक्तीचा स्थानिक नागरिकांनी शोध घेतला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ही व्यक्ती बरीच पुढे गेली होती. स्थानिकांनी त्या व्यक्तीला वाचवले आहे.

जुन्नरमध्ये तुफान पाऊस

जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथील पुलावरून जात असताना हा प्रकार घडला होता. एकनाथ बबन रेंगडे असे या घटनेत बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या जुन्नरमध्ये तुफान पाऊस बरसत आहे. अनेक नदी, नाले, ओढे अक्षरश: ओसंडून वाहत आहेत. त्यात ज्या पुलांना कठडे नाहीत, त्याचा अंदाज चालणाऱ्यांना येत नाही. त्यातूनच हा प्रकार घडला.

हे सुद्धा वाचा

लेण्याद्रीतील परिस्थिती

पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री डोंगर परिसरात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने थेट डोंगरावरून पायरी मार्गाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला रौद्र रूप प्राप्त झाले आहे. मात्र अशातही जीव धोक्यात घालून भाविक आणि पर्यटक डोंगरावर जात आहेत. लेण्याद्री डोंगरावर पडत असलेला सर्व पाऊस याच पायरी मार्गाने जोरात खालच्या दिशेने येत असताना या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. तर संततधार पावसामुळे कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात सावर्णे गावाजवळ महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. झाड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले.

अंगावर काटा आणणारं जुन्नरमधलं दृश्यं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.