AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोट्या प्रतिज्ञापत्राच्या प्रकरणात कोर्टाची क्लीन चिट, चंद्रकांत पाटलांना भावना अनावर

चंद्रकांत पाटलांनी विधानसभा निवडणुकीत खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलं नसल्याचा निकाल देत पुण्यातील फौजदारी न्यायालयाने दिलासा दिला (Chandrakant Patil Fake affidavit case)

खोट्या प्रतिज्ञापत्राच्या प्रकरणात कोर्टाची क्लीन चिट, चंद्रकांत पाटलांना भावना अनावर
| Updated on: Jan 19, 2021 | 12:32 PM
Share

पुणे : खोटं शपथपत्र दाखल केल्याच्या आरोपातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची सुटका झाली आहे. चंद्रकांतदादांनी विधानसभा निवडणुकीत खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलं नसल्याचा निकाल देत पुण्यातील फौजदारी न्यायालयाने क्लीन चिट दिली. हा सत्याचा विजय असल्याची भावनिक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली. (Chandrakant Patil gets emotional after relief in Fake affidavit case by Pune Court)

“माझ्याविरुद्ध कुभांड रचले”

“एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्यातील महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री होतो. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करतो, हे काही हितशत्रूंना मानवत नाही. त्यातून माझ्याविरुद्ध कुभांड रचले जाते आणि मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अखेर सत्याचाच विजय होतो, हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. अशा आरोपांची आता सवय झाली असून खोट्या आरोपांमुळे अनावश्यक मानसिक त्रास होतो, मात्र अशा कट कारस्थानातून मी अधिक तावून सुलाखून बाहेर पडतो. समाजसेवेचे जे व्रत स्वीकारले आहे, ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा सज्ज होतो, असे भावनिक उद्गार चंद्रकांतदादांनी काढले.

पुणे फौजदारी कोर्टाकडून खटला निकाली

पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकल्यावर चंद्रकांत पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केल्याचा आरोप करत अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 125 (अ) अन्वये चंद्रकांत पाटील यांच्या निवडीविरुद्ध दाद मागितली होती. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात (JMFC) याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी विस्तृत निकालपत्रात चंद्रकांत पाटलांविरुद्ध असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. सदर तक्रार काढून टाकली (Complaint Dismissed) आणि खटलाही निकाली काढला ( Case is Disposed off) .

तक्रारदाराच्या सर्व तक्रारींची आणि सोबतच्या साक्षी पुराव्यांची शहानिशा करुन न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध असलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. (Chandrakant Patil gets emotional after relief in Fake affidavit case by Pune Court)

न्यायालयाचे निरीक्षण काय?

1) चंद्रकांत पाटील यांनी शपथपत्रात जोडलेली आयकर विवरणपत्र योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवले. 2) निवडणूक लढवत असताना चंद्रकांत पाटील कोणत्याही लाभाच्या पदावर नसल्याने हा दावाही फेटाळण्यात आला. 3) चंद्रकांत पाटील ज्या पदांवर पदसिद्ध होते त्या पदावरील व्यक्तीस मानधन मिळत नसल्याने शपथपत्रात उत्पन्न लपवले असे म्हणणेही अयोग्य असल्याचे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. 4) चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध कोल्हापूरच्या न्यायालयात दाखल गुन्ह्याप्रकरणी न्यायाधीशांनी तक्रारदाराचे म्हणणे फेटाळले आहे.

संबंधित बातम्या 

एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; चंद्रकांतदादांची पहिली प्रतिक्रिया

(Chandrakant Patil gets emotional after relief in Fake affidavit case by Pune Court)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.