AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपचे मतदारसंघ आहेत, मी देखील त्या मतदारसंघात लक्ष घालेल…’, अजित पवार यांचा भाजपला थेट इशारा

छत्रपती सहकारी साखर कारखान्यात मिळालेल्या विजयानंतर अजित पवार यांनी बारामतीत मेळावा घेऊन भाजपला इशारा दिला. भाजपचे जे मतदारसंघ आहेत. तिथे देखील माझे कार्यकर्ते आहेत. मी देखील त्या मतदारसंघात लक्ष घालेल.

'भाजपचे मतदारसंघ आहेत, मी देखील त्या मतदारसंघात लक्ष घालेल...', अजित पवार यांचा भाजपला थेट इशारा
ajit pawar
Follow us
| Updated on: May 22, 2025 | 12:56 PM

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अजित पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत भाजपचे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजीराव थोरात यांनी उडी घेऊन चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अजित पवार यांच्या पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवला होता. मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी गुरुवारी सभा घेतली. या सभेतून थेट भाजपला इशारा दिला. भाजपचे जे काही मतदारसंघ आहेत. तिथे देखील माझे कार्यकर्ते आहेत. मी देखील त्या मतदारसंघात लक्ष घालेल, असे अजित पवार यांनी म्हटले.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात मतदारांचे आभार मानत सांगितले की, छत्रपती सहकारी साखर कारखाना ऊस दर कमी असताना देखील निर्विवाद बहुमत दिले. बारामतीमधील सभासदांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आम्ही बाहेर काढला. ज्या गोष्टी मी ठरवतो ते पूर्ण करतो त्या कामासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावतो.

काहींना निवडणुकीची होती घाई

छत्रपती सहकारी साखर कारखान्यात मिळालेल्या विजयानंतर अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अजित पवार यांनी रंजन तावरे यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, काही जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगत होते, निवडणूक लावा. परंतु मी देखील महायुतीमधील छोटा घटक आहे. काही जणांना चैन पडत नव्हते उठले की मुंबईत येत होते. निवडणूक लावा असे मुख्यमंत्री यांना सांगत होते.

हे सुद्धा वाचा

माळेगाव साखर कारखाना 15 लाख साखर मेट्रिक टन विक्रमी उत्पादन झाले. सुरवातीला पवार साहेब यांनी 1991 नंतर मला संधी दिली. त्या संधीचे सोने करण्याचे काम मी करीत आहे. मी माझ्यासमोर कुणीही असेना माळेगाव साखर कारखान्यात पॅनल उभा करणार आहे. तसेच प्रचाराचा नारळ फोडताना चेअरमन कोण असणार? हे देखील सांगेल, असे अजित पवार यांनी म्हटले.

16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?.
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय.
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.