Maratha Morcha: मुख्यमंत्र्यांना कधी भेटायचं हे गुरुवारी ठरवणार, पण आंदोलने सुरूच राहणार: संभाजी छत्रपती

राज्य सरकारने आम्हाला चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे आम्हीही सरकारला सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाण्याकरिता आम्हाला काही मुद्द्यांचा अभ्यास करून जावं लागणार आहे.

Maratha Morcha: मुख्यमंत्र्यांना कधी भेटायचं हे गुरुवारी ठरवणार, पण आंदोलने सुरूच राहणार: संभाजी छत्रपती
Sambhajiraje

कोल्हापूर: राज्य सरकारने आम्हाला चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे आम्हीही सरकारला सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाण्याकरिता आम्हाला काही मुद्द्यांचा अभ्यास करून जावं लागणार आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही. त्यांना कधी भेटायचं हे उद्या गुरुवारी ठरवू, असं सांगतानाच राज्य सरकारबरोबर आमच्या चर्चा होत असली तरी आंदोलनेही सुरूच राहणार आहेत, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. (Chhatrapati Sambhaji Raje will meet cm uddhav thackeray to discuss maratha reservation)

मराठा मूक मोर्चाची सांगता झाल्यानंतर संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सरकारबरोबर उद्या चर्चा करणार नाही. सरकारबरोबर चर्चा करण्याचा निर्णय उद्या घेऊ. कदाचित सरकारशी परवाही चर्चा करता येईल. सरकारने सकारात्मक पाऊल टाकलं आहे. आम्हीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत, असं संभाजीराजे यांनी सांगितलं.

तर विजयोत्सव साजरा करू

राज्य सरकारने चर्चेचं आमंत्रण दिलं असलं तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडचे नियोजित आंदोलन होणारच आहे, असं सांगतानाच सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यास नाशिकचे आंदोलन विजयोत्सव म्हणून साजरा करू, असंही त्यांनी सांगितलं.

संभाजीराजेंना चर्चेचं निमंत्रण

दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजेंना मुंबईत येऊन राज्य सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासनच दिलं. राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करणे आमचं कर्तव्य आहे. सुप्रीम कोर्टातील वकिलांची टीम आपण बदलली नाही. केंद्र आणि राज्याच्या समनव्याची जबाबदारी संभाजीराजे तुमची आहे, राजेंनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि प्रमुख मंडळींना आपल्यासोबत बसून चर्चा करायची आहे, उद्याच तुम्ही मुंबईलाला यावं, उद्या मुख्यमंत्री, अजितदादा भेटतील. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, हातात हात घालून चालायला हवं. संयमाच्या भूमिकेचं कौतुक आहे, संयमाला चर्चेची साथ देऊ. राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देतो, असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं.

पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी

“मला उपमुख्यमंत्री अजित पवार भेटून गेले. त्यांनी मागण्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. घटनेत आतापर्यंत अनेक अमेण्टमेंट झाल्या. आता अजून एक करायला काय हरकत आहे? पंतप्रधानांसमोर आणखी एकदा हा विषय गेला पाहिजे. पंतप्रधानाचे विचार काय ते स्पष्ट झाले नाहीत. त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे”, अशी मागणी असं खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी केली. (Chhatrapati Sambhaji Raje will meet cm uddhav thackeray to discuss maratha reservation)

 

संबंधित बातम्या:

Maratha Morcha: मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरचीच निवड का?; वाचा सविस्तर 

सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, हसन मुश्रीफांची गर्जना, आघाडी सरकारची ‘ती’ चूकही मान्य!  

हाताला सलाईनची सुई, अंगात अशक्तपणा, तरीही शिवसेनेचा खासदार भर पावसात मराठा मोर्चात अग्रस्थानी!

(Chhatrapati Sambhaji Raje will meet cm uddhav thackeray to discuss maratha reservation)