AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार गणेशोत्सवाला भेटीला आले नाहीत म्हणून शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचं टोकाचं पाऊल

महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अशी घटना घडल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना लागलीच ताब्यात घेतले आहे.

अजित पवार गणेशोत्सवाला भेटीला आले नाहीत म्हणून शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचं टोकाचं पाऊल
अजित पवार गणेशोत्सवाच्या भेटीला आले नाहीत म्हणून शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचं टोकाचं पाऊल
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 10, 2024 | 5:33 PM
Share

महायुतीमधील धुसफूसीच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. एकीकडे महायुतीच्या बड्या नेत्यांकडून सारं काही आलबेल आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महायुतीमधील धुसफूसीच्या घटना समोर येत आहेत. विशेष म्हणजे काही घटना या महायुतीमधील बड्या नेत्यांच्या वागणुकीमुळे देखील घडत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण बारामतीत अशाच एका घटनेची राज्यात आता चर्चा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हामुख सुरेंद्र जेवरे यांनी निमंत्रण देवून सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे गेले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या सुरेंद्र जेवरे यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांच्या या कृत्यावर आता शिवसेना पक्षश्रेष्ठी काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये एकनाथ गणेशोत्सव साजरा केलेला आहे. या गणेशोत्सवाच्या मंडपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार यांचेही फोटो त्यांनी लावले होते. अजित पवार यांनी बारामतीत सगळ्या गणेशोत्सवांना भेटी दिल्या. मात्र आपल्या गणेशोत्सवाला भेट दिली नाही म्हणून सुरेंद्र जेवरे यांनी त्यांच्या फोटोला काळे कापड लावले. या घटनेनंतर तणाव वाढताच पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले.

महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अशी घटना घडल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना लागलीच ताब्यात घेतले. सुरेंद्र जेवरे यांनी या घटनेनंत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेनुसार, अजित पवार यांनी मुद्दामून आपल्या गणपती मंडळाला भेट दिली नाही. त्यामुळे आपण अशाप्रकारचं कृत्य केल्याचं सुरेंद्र जेवरे यांनी सांगितलं.

सुरेंद्र जेवरे नेमकं काय म्हणाले?

“एकनाथ गणेशोत्सव साजरा करत असताना मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही लोकाभिमुख कार्यक्रम ठेवले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती मध्ये दौरा होता. या दौऱ्याच्या दरम्यान अजित पवार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. अगदी छोट्या-छोट्या तरुण मंडळाच्या गणपतीला देखील भेट दिली. मात्र आम्ही विनंती करूनही अजित पवार या मंडळाकडे फिरकले नाहीत. अजित पवार यांच्या कुटुंबातील सर्वांचे छायाचित्र या मंडळापुढे लावूनही कुटुंबातील हे कोणी तिकडे फिरकले नाही. त्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त केली”, अशी प्रतिक्रिया सुरेंद्र जेवरे यांनी दिली.

Follow Us
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?