पुण्यात कोरोना वेगानं पसरतोय अन.. महापौरांना गुजरात दौऱ्याचं पडलयं

पुण्यात कोरोना वेगानं पसरतोय अन..  महापौरांना गुजरात दौऱ्याचं पडलयं
Murlidhar Mohol

गुजरातचा दौरा परदेशात नाही. त्यामुळे कोरोना आणि दौरा हे दोन वेगळे विषय आहेत . पालिका हद्दीत उभे राहणाऱ्या दोन महत्वाच्या प्रकल्पा संदर्भात हा गुजरातचा अभ्यास दौरा असल्याचे सांगत महापौर मुरलीधर मोहळ दौऱ्याचे समर्थन केलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 05, 2022 | 12:38 PM

पुणे- शहरात कोरोनाची रुग्ण झपाट्याने वाढतायत, शहरात तिसरी लाट सुरु झाली असून ओमिक्रोनच्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढत असल्याचे समोर आले तर दुरीकडं महापौर मुरलीधर मोहळ स्थायी समिती अध्यक्ष , मनपा आयुक्त, मनपा अतिरिक्त आयुक्त मात्र गुजरात दौऱ्यावर निघाल्याने सत्ताधारी व विरोधकात कलगी तुरा रंगलेला आहे. महापौरांचा हा दौरा रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

जनतेच्या पैश्यांची उधळपट्टी कोरोनाची तिसरी लाट सुरू होण्याबरोबच शहरात कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. या परिस्थितीत महपौरांनी शहरात थांबणे आवश्यक आहे. महापालिकेच्या पैशाने गुजरात दौरा करणाऱ्या महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी बंद करावी. मनपातील सत्ताधारी भाजपचा कार्यकाळ संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना, महापौरानीं गुजरात दौरा रद्द करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे यांनी केली आहे.

पुणेकरांना संकटात लोटण्यातच धन्यता

पुण्यात करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना सत्ताधारी भाजपची मंडळी आणि प्रशासन गुजरातच्या दौऱ्यावर आणि पुणेकरांना मात्र संकटात लोटण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळो व त्यांना साबरमती आधी पुणे शहरातील समस्यांचे दर्शन घडो, हीच प्रार्थना दगडूशेठ गणपतीचरणी करत असल्याचा उपासात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मारला आहे.

  महत्वाच्या प्रकल्पा संदर्भात   गुजरातचा अभ्यास दौरा

विरोधकांनी केलेल्याआरोपांना   महापौर मुरलीधर यांनी उत्तर दिले आहे. गुजरातचा दौरा परदेशात नाही. त्यामुळे कोरोना आणि दौरा हे दोन वेगळे विषय आहेत . पालिका हद्दीत उभे राहणाऱ्या दोन महत्वाच्या प्रकल्पा संदर्भात हा गुजरातचा अभ्यास दौरा असल्याचे सांगत महापौर मुरलीधर मोहळ दौऱ्याचे समर्थन केलं आहे.

Radhe Shyam Postponed | प्रभासच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार! ‘राधे श्याम’चं प्रदर्शन लांबणीवर!

IND vs SA: रिषभ पंतचा जोहान्सबर्गमध्ये धडाका, अनोखी सेंच्युरी करत धोनी किरमाणी यांच्या क्लबमध्ये प्रवेश

‘सिंधुताईंबद्दल निघून गेल्या हा शब्द कोणीही वापरु नका, वादळ होत शांत झालं’

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें