Video : ‘लालपरी’त महिला क्रांती, एसटीच्या इतिहासात प्रथमच महिलेने चालवली बस, कोण आहे ती महिला?

ST First lady driver : राज्यात पहिली एसटी धावल्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी महिलेच्या हातात एसटीचे स्टेयरींग दिले आहे. पहिली एसटी अहमदनगर ते पुणे धावली होती. आता महिला चालकानेही पुणे जिल्ह्यातून बस चालवली आहे.

Video : 'लालपरी'त महिला क्रांती, एसटीच्या इतिहासात प्रथमच महिलेने चालवली बस, कोण आहे ती महिला?
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 12:04 PM

प्रदीप कापसे, पुणे : राज्यातील पहिली एसटी बस 1948 मध्ये अहमदनगर ते पुणे दरम्यान धावली होती. त्यावेळी एसटीचे वाहक म्हणून लक्ष्मण केवटे आणि चालक म्हणून किसन राऊत यांच्याकडे जबाबदारी दिली होती. काही दिवसांपूर्वी राज्यातील पहिल्या एसटीचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 99 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनाच्या काही दिवसानंतर पुणे जिल्ह्यातून एसटीमध्ये क्रांतीकारी बदल झाला आहे. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदा एका महिलेने एसटी चालवली आहे.

अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक आणि वाहक दोघेही अहमदनगरचे होते. लक्ष्मण केवटे हे एसटी महामंडळातून 30 एप्रिल 1984 रोजी सेवानिवृत्त झाले होते. अहमदनगर ते पुणे हे सव्वाशे किलोमीटरचं अंतर कापत एसटीने पहिला प्रवास केला. आता एसटीने पुन्हा एक क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेने बस चालवली आहे. एसटी सुरु झाल्याच्या तब्बल ७५ वर्षांनी महिलेच्या हातात एसटीचे स्टेयरींग आले आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने चालवली बस आहे.

हे सुद्धा वाचा

कोणी चावली बस

पहिली बस चालवण्याचा मान अर्चना अत्राम या महिलेला मिळाला आहे. अर्चना यांनी सासवड डेपोतून नीरासाठी बस चालवली. अत्राम यांचा बस चालवल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एसटी महामंडळामध्ये महिला वाहकाची नियुक्ती गेल्या काही वर्षांपासून होत आहे. पण, अद्यापर्यंत महिला चालक एसटी महामंडळात नव्हत्या.

75 वर्षांनी संधी

एसटीला 1 जून रोजी 75 वर्षे पूर्ण झाली. अमृत महोत्सवी सांगता झाल्यानंतर महिलेला एसटी चालवण्याची संधी मिळाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विच करून अत्राम यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले आहे की, नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची… आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.