Pune Gold Rates | सोने खरेदी करताय? जाणून घ्या पुण्यातला आजचा सोन्या-चांदीचा भाव

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 19, 2021 | 11:50 AM

मागच्या काही दिवसांत सोन्याकडे लोक उत्तम गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार देशात सोन्याचे भाव बदलत असतात. तुम्हाला जर आज सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर पुण्यातल्या बाजारपेठांमधले भाव जाणून घेणं गरजेचं आहे.

Pune Gold Rates | सोने खरेदी करताय? जाणून घ्या पुण्यातला आजचा सोन्या-चांदीचा भाव
Gold Silver Price
Follow us

पुणे : मागच्या काही दिवसांत सोन्याकडे लोक उत्तम गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार देशात सोन्याचे भाव बदलत असतात. तुम्हाला जर आज सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर पुण्यातल्या बाजारपेठांमधले भाव जाणून घेणं गरजेचं आहे. (Gold silver latest price in Pune today)

पुण्यात काय आहे सोन्याचा दर?

पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 48 हजार 820 आहे. तर 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 45 हजार 600 रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 1 0 रुपयांनी वधारला आहे. काल (18 ऑगस्ट) 22 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव पुण्यात 45 हजार 590 होता तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 48 हजार 810 इतका होता.

12 ऑगस्टपासून सातत्यानं वाढतोय सोन्याचा दर

पुण्यात 12 ऑगस्टपासून सोन्याचा दर रोज वाढतोय. 11 ऑगस्टला पुण्यात सोन्याचा दर 22 कॅरेटसाठी प्रतितोळा 44 हजार 440 होता. त्यात रोज वाढ होत आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरातही रोज वाढ होत असल्याचं दिसतंय. 11 ऑगस्टला 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 47 हजार 520 होता. साधारण एका आठवड्यात सोन्याचा दर 1300 रुपयांनी वाढला आहे.

जुलै महिन्यात वाढला सोन्याचा दर

पुण्यात सातत्यानं सोन्याच्या भावात चढ-उतार पहायला मिळतोय. गेल्या महिन्यात 1 जुलैला पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळ 46 हजार 190 होता तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 47 हजार 190 होता. 31 जुलैला हा भाव वाढून 22 कॅरेटसाठी 46 हजार 600 तर 24 कॅरेटसाठी 49 हजार 870 झाला होता. जुलै महिन्यात पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दरानं उच्चांक गाठत 40 हजार 880 रुपयांपर्यंत पोहोचला होता. या महिन्यात सोन्याच्या दरात 5.68 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली.

चांदीच्या दरात मात्र घसरण

एकीकडे पुण्यात सोन्याचा दर वाढत असल्याचं दिसत असलं तरी दुसरीकडे चांदीचा दर मात्र कोसळताना दिसतोय. आज पुण्यात चांदीच्या दरात तब्बल 1 हजार रुपयांची घसरण पहायला मिळाली. आज पुण्यात एक किलो चांदीचा दर 62 हजार 500 रुपये आहे. काल एक किलो चांदीचा दर हा 63 हजार 500 इतका होता. एकाच दिवसात चांदीचा दर 1 हजाराने पडला आहे.

पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?

आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

काय आहे International Bullion exchange, भारतातील सोन्याच्या व्यापारात आमुलाग्र बदल होणार?

Petrol Diesel Price: डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण, जाणून घ्या आजचा दर

महाराष्ट्रासह 3 राज्यांत 1700 रुग्णवाहिकांची BVG मार्फत सेवा, कोण आहेत हणमंतराव गायकवाड?

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI