आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच गोपीचंद पडळकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Gopichand Padalkar on Maratha and OBC Reservation : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर भाष्य केलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच गोपीचंद पडळकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
गोपीचंद पडळकरImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 6:55 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. सग्या- सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणं गजरेचं असल्याचं मनोज जरांगेंचं म्हणण आहे. तर ओबीसी नेत्यांचा मात्र त्याला कडाडून विरोध केला आहे. मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावं. मात्र त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, असं ओबीसी समाजाचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटनांच्या बैठका होत आहेत. या सगळ्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

मराठा समाजाला वेगळं 10 टक्के आरक्षण दिले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात आलं आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तरी आंदोलन सुरू आहे. ओबीसी समाजात काही संभ्रम निर्माण होऊ याबाबत सरकरने भूमिका मांडावी. ओबीसी समाजाने जागृत होण्याची गरज आहे. ओबीसी समाजाने एकजूट करावी. विधानसभा बाबत ओबीसी वेगळी भूमिका घेण्यासंदर्भात अजून कुठलाही निर्णय झाला नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यात बैठक झाली. पुणे शहरातील संघ कार्यालय मोतीबागेत बैठक पार पडली. बैठकीला माढाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. भाजप नेते गोपीचंद पडळकर, खासदार धनंजय महाडिक, नवनाथ पडळकर हे नेते उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून भाजप नेत्यांना मार्गदर्शन केलं गेलं आहे. या बैठकीनंतर पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला.

छगन भुजबळ नाराज आहेत?

छगन भुजबळ नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राज्यसभेची उमेदवारी सुनेत्रा पवार यांना देण्यात आल्यानंतर छगन भुजबळ हे अजित पवार गटात नाराज असल्याची चर्चा आहे. यावर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांची मी पत्रकार परिषद बघितली. त्यांनी स्पष्ट सांगितले की मी नाराज नाही. त्याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. कार्यकर्त्यांची ती भूमिका असते, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत.

Non Stop LIVE Update
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं.
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं..
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली.
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्..
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्...
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक.
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा...
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा....
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.