Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर, पुणे हिट अँड रन प्रकरणी कडक कारवाई होणार?

देवेंद्र फडणवीस आज अचानक पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाले. त्यांच्याकडून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला गेला. देवेंद्र फडणवीस यांची पुणे पोलीस आयुक्तांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना नेमक्या काय सूचना दिल्या? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर, पुणे हिट अँड रन प्रकरणी कडक कारवाई होणार?
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 3:21 PM

पुण्यात हिट अँड रन प्रकरणावरुन पोलीस, न्याय व्यवस्थेवर सर्वसामान्य नागरिकांकडून ताशेरे ओढण्यात आल्यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. देवेंद्र फडणवीस आज अचानक पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाले. त्यांच्याकडून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला गेला. देवेंद्र फडणवीस यांची पुणे पोलीस आयुक्तांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना नेमक्या काय सूचना दिल्या? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कामाकाजावरही संशय निर्माण झालाय. तसेच पोलिसांवरही गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांनंतर आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून हे प्रकरण कसं हाताळतात? ते देखील महत्ताचं आहे.

या प्रकरणावरुन सर्वत्र चर्चा होऊ लागल्यानंतर आता पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागही अ‍ॅक्शन मोडवर आलं आहे. राज्य उत्पादन शुल्काने दोन पबवर कारवाई केली आहे. हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यात 18 मे ला रात्री अडीच वाजता पुण्यात कल्याणीनगरमध्ये भरधाव पोर्शे कारने दुचाकीसह 2 वाहनांना धडक दिली. पोर्शे कारच्या धडकेत अनिस अहुदिया या तरुणासह त्याची मैत्रीण अश्विनी कोष्टाचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातली बिल्डर विशाल अग्रवालचा अल्पवयीन मुलगा पोर्शे कार चालत होता. आरोपीला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेत लगेच जामीन मंजूर केला होता. चुकीचे गुन्हे दाखल केल्याची चर्चा होऊ लागली.

यानंतर पोलिसांकडून कडक कारवाईचे संकेत देण्यात आले. 20 मे ला 12.48 वाजता आरोपीच्या वडिलांसह हॉटेल मालकांवर बाल न्याय अधिनियम 2015 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कडक कारवाई व्हावी म्हणून विविध सामाजिक संघटना, भाजप, मनसे, काँग्रेसकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेत निवेदन दिलं.

आमदार रवींद्र धंगेरकरांनी पुणे पोलिसांवर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्यांनी येवरडा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं. दरम्यान, आरोपीने मित्रांसह मुंढव्यातल्या कोझी आणि ब्लॅक हॉटेलमध्ये पार्टी केल्याचं उघड झालं आहे. या दोन्ही हॉटेलच्या मालकांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संजीप सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीचे वडील विशाल अग्रवाललाही अटक करण्यात आली आहे.

अपघाताच्या वेळी पोर्शे कारचा वेग हा 200 किमी प्रतितास असा होता. अपघातानंतरच्या पुढील चौकशीत कारची किंमत ही अडीच कोटींच्या घरात आहे, अशी माहिती समोर आली. आरोपीला बाल न्याय मंडळाने रविवारी जामीन मंजूर केला होता. सुटकेसाठी 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याची अट घालण्यात आली. अपघाताचे परिणाम आणि त्याचं निराकरण यावर 300 शब्दांचा निबंध लिहा या अटीवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आरोपीला पोलीस ठाण्यात आणलं तेव्हा त्याला पोलिसांनी पिझ्झा, बर्गर देवून स्पेशल ट्रिटमेंट दिल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरणातील 3 आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी बजावण्यात आली आहे. तर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली असून त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.  “पुण्यात जी अतिशय गंभीर घटना घडली त्या घटनेबाबत आपल्याला कल्पना आहे की, एका अल्पवयीन मुलाने गाडी चालवत असताना अपघात केला आणि दोन लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर घडलेल्या घटनांबाबत लोकांमध्ये एक संताप आणि नाराजी पाहायला मिळाली. या संदर्भात आज मी पोलीस भागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय घडलं आहे, पुढची कारवाई काय त्यासोबत अशा घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी बाल न्याय मंडळाच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केलं. तसेच पुणे पोलिसांची पाठराखण केली.

“अशा प्रकरणात पोलिसांनी पुरावे दिले आहेत. कोणत्या हॉटेलात आहे, काय केलं, वयाचे पुरावे दिले, गाडीचे पुरावे दिले, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि दुरुस्ती दिल्यानंतर ज्युवेनाईल बोर्डाने आश्चर्यकारक भूमिका घेतली. त्यामुळे वरच्या कोर्टात अर्ज केला. कोर्टाने या संदर्भात सांगितलं की या बाबत ज्युवेनाईल कोर्टात जावं लागेल. या कायद्यात त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार ज्युवेनाईल बोर्डाला आहे. त्यांनी नाही केलं तर आमच्याकडे या. आम्ही अर्ज केला. आज किंवा उद्या या ऑर्डरवर सुनावणी होईल. वरच्या कोर्टाचा दृष्टीकोण पाहता ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड ऑर्डर देतील. नाही दिली तर आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. या प्रकरणात जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची इच्छा आहे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.