दारुची बाटली आणायला नकार, मित्रांकडून मित्राचा भोसकून खून, दोघांना बेड्या

दारुची बाटली आणायला नकार दिल्याने मित्रांनी मित्राचा धारधार शस्त्रांनी भोकसून खून केलाय. | In Kolhapur Friend murdered friend for refusing to bring a bottle of liquor

दारुची बाटली आणायला नकार, मित्रांकडून मित्राचा भोसकून खून, दोघांना बेड्या
kolhapur Murder.

कोल्हापूर :  दारुची बाटली आणायला नकार दिल्याने मित्रांनी मित्राचा धारधार शस्त्रांनी भोसकून खून केलाय. कोल्हापूरच्या शिरोली दर्ग्यानजीकची ही भयंकर घटना आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (In Kolhapur Friend murdered friend for refusing to bring a bottle of liquor)

पार्टीसाठी दारुची बाटली आणायला नकार दिल्याने अमित राठोड या 22 वर्षीय तरुणाचा त्याच्याच दोन मित्रांनी धारदार शस्त्रांनी वार करुन खून केला. गांजा आणि दारुच्या नशेत समीर नदाफ आणि योगेश साखरे (दोघांचंही वय 20) यांनी चाकूने अमितला भोकसलं. शिरोलीतल्या पीर दर्गाच्या पाठीमागे बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

गांधीनगर भागात राहणाऱ्या मित्रांच्या गँग पुणे-बँगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पीर दर्ग्याच्या पाठीमागे पार्टीचं नियोजन केलं होतं. परंतु अगोदरच दारुच्या नशेत असलेल्या समीर नदाफ आणि योगेश साखरे यांनी अमित राठोडला दारुची बाटली आणायला सांगितली. अमितने दारुची बाटली आणायला नकार दिल्याने नदाफ आणि योगेशला राग अनावर झाला. त्यांनी अमितच्या पोटात धारदार शस्त्रांनी वार करुन त्याचा खून केला.

अमित रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ल्यानंतर नदाफ आणि योगेशने घटनास्थळावरुन पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या अमितला रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालय प्रशासनाने अमितला मृत घोषित केले.

दरम्यान, समीर नदाफ आणि योगेश साखरेला शिरोली आणि गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरोली एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी आरोपींना पकडलं आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. (In Kolhapur Friend murdered friend for refusing to bring a bottle of liquor)

हे ही वाचा :

सख्खे भाऊ पक्के दरोडेखोर, दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गुजरातमधील व्यापाऱ्याचे अपहरण करुन फरार, नागपूर पोलिसांच्या जाळ्यात सापडला

पिंपरी-चिंचवडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 16 नायजेरियन तरुणी ताब्यात

Published On - 8:47 am, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI