IndiGo Flight: चुकीला माफी नाही! इंडिगोवर काय कारवाई होणार? मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टच सांगितले की…
Minister Murlidhar Mohol: इंडिगो एअरलाईन्समुळे देशभरातील विमानतळावर गोंधळाची स्थिती कायम आहे. इंडिगोच्या ढिसाळ आणि बेफिकीरवृत्तीमुळे जगभरात मोठी नाचक्की झाली.त्यावर आता सरकारकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काय दिली माहिती?

Indigo Flight Cancelled Crisis: इंडिगो एअरलाईन्सने हवाई सेवेची लक्तरे देशाच्या वेशीवर टांगली. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ अजूनही निस्तारलेला नाही. सकाळी तिकीट काऊंटरवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा होत्या. कंपनीला आगाऊ इशारा देऊन ही ड्युटी टाईमचा घोळ न निस्तारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच विमान सेवेची इभ्रतही निघाली. या मोठ्या गोंधळानंतर काल परवा सरकारला जाग आली आणि घाई घाईत कंपनीला एक नोटीस बजावण्यात आली. पण कंपनीला चांगला भूर्दंड ठोठावण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. दरम्यान यासर्व प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चुकीला माफी मिळणार नाही असे सांगत मोठ्या कारवाईचा इशारा दिला आहे.
इंडिगोमुळे प्रवाशांना मनस्ताप
इंडिगो मुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे. इंडिगो ने ज्या काही गोष्टी कार्याला पाहिजे होता त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. विमान सेवा देणाऱ्या कंपनी आहे पायलट संघटनेने मागणी केली होती की ड्युटी चे वेळा कमी करायला पाहिजे होत्या. त्यानंतर डीजीसीए ने याविषयीचे निर्देश दिले. त्याची अंमलबजावणी इतर कंपन्यांनी तात्काळ केली. त्यासाठी दोन टप्पे निश्चित करण्यात आले होते. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत इंडिगोने यावर कोणतेही काम केले नसल्याची प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ही सर्व चूक इंडिगोची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
का झाला गोंधळ?
ऐनवेळी कामाची १० तासांची वेळ ८ तासांवर आली. २ तासांच्या फरकामुळे अधिक मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली. १ नोव्हेंबर पासून हा ताण इंडिगोवर वाढला आणि त्यांची यंत्रणा कोसळली असे मुरलीधर मोहोळ म्हणाले. या सर्व प्रकाराची भारत सरकारच्या नागरी उड्डाण खात्याने दखल घेतली. आता यासंदर्भात सूचना आणि नियम जारी केल्याची माहिती त्यांनी दिली. इंडिगो ला कालावधी लागेल म्हणून सगळ्या सिस्टिमला फेब्रुवारी पर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
4 सदस्यीय चौकशी समिती
या सर्व गोंधळाची गंभीर दखल घेण्यात आली असून DJCA ने चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नेमल्याचे आणि प्रवाशांसाठी कंट्रोल रूम उभारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या डीजीसीएने इंडिगो कंपनीला नोटीस बजावली आहे. चुकीला माफी देता येणार नाही. योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ही त्यांनी दिले.
भरमसाठ तिकीट दरावर नियंत्रण
इंडिगोचा खोळंबा होताच इतर कंपन्यांनी मनमानी पद्धतीने तिकीट दर आकारणी सुरू केली. प्रवाशांची लूट सुरू केली होती. पण या भरमसाठ तिकीट दरावर नियंत्रण आणण्यात आल्याचे आणि विमान कंपन्यांना याविषयीचे आदेश दिल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. ज्या लोकांची विमान रद्द झाली त्यांना सगळ्यांना पैसे परत देण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत. ४ सदस्यीय समिती नेमली आहे त्याचा अहवाल आला की पुढील कारवाई करण्यात येईल असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
