AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात कोंढरी गावात दरड कोसळली, भोर महाड रस्त्यावर 30 ठिकाणी भूस्खलन

मुसळधार पावसाने पुण्यातील भोर तालुक्याच्या कोंढरी गावाजवळ दरड कोसळलीय. त्यामुळे प्रशासनानं संपूर्ण गाव स्थलांतरित केलं. दरड कोसळल्यानं कोंढरी गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले आहेत.

पुण्यात कोंढरी गावात दरड कोसळली, भोर महाड रस्त्यावर 30 ठिकाणी भूस्खलन
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 25, 2021 | 6:17 PM
Share

पुणे : मुसळधार पावसाने पुण्यातील भोर तालुक्याच्या कोंढरी गावाजवळ दरड कोसळलीय. त्यामुळे प्रशासनानं संपूर्ण गाव स्थलांतरित केलं. दरड कोसळल्यानं कोंढरी गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले आहेत. अतिवृष्टीनं भोर महाड रस्त्यावर प्रचंड प्रमाणात भुस्खलन झालंय. 30 ठिकाणी दरड कोसळल्यानं भोर महाड रस्ता संपूर्ण बंद झालाय.

कोंढरी गावात मोबाईल नेटवर्क नसल्यानं नागरिकांचा कोणाशीही संपर्क नाही. गावातील 300 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. दरडी कोसळल्यानं रस्त्यावर अक्षरशः दगडांचा खच पडलाय. डोंगरावरून झाडं रस्त्यावर आलीत. त्यामुळे आणखी 5 दिवस रस्ता मोकळा करण्यासाठी लागणार आहे.

सरकार कोंढरी गावचे तळीये-माळीण होण्याची वाट पारतंय का? : आमदार संग्राम थोपटे

आमदार संग्राम थोपटे यांनी कोंढरीतील परिस्थितीवरुन सरकारवर हल्लाबोल केलाय. शासन कोंढरी गावचं तळीये किंवा माळीण होण्याची वाट पहात आहे का? असा सवाल संग्राम थोपटे उपस्थिती केला.

पुण्यात अतिवृष्टीचा फटका, 12 गावं अंधारात, 7 गावांचा संपर्क तुटला, संपूर्ण कोंढरी गाव स्थलांतरीत

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यालाही मोठा फटका बसलाय. मुसळधार पावसानंतर भोर तालुक्यातील 12 गावं अंधारात गेलीत, तर 7 गावांचा संपर्क तुटलाय. याशिवाय डोंगराला भेगा पडल्याने शेजारील संपूर्ण कोंढरी गावाचं स्थलांतर केलंय. या गावातील सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

घाटमाथ्यावर सलग पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोंढरी गावात सलग 3 वर्षांपासून भुस्खलन होत आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा गावातील 40 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

हेही वाचा :

राज्यात पुराचं संकट, यंदा माझा वाढदिवस साजरा करू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

केंद्राकडून महाराष्ट्राला मदत, एनडीआरएफची 26 पथकं, हवाईदलाचे 4 हेलिकॉप्टर्ससह लष्करही दाखल

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, वेगवेगळ्या घटनांमध्ये 89 जणांनी जीव गमावला, कुठे किती मृत्यू?

व्हिडीओ पाहा :

Land sliding in Kondhari Bhor Pune after heavy rain

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!