Pune Lockdown : राज्य सरकारचं पुण्याकडे साफ दुर्लक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा गंभीर आरोप

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक बनत चाललं आहे. अशावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय.

Pune Lockdown : राज्य सरकारचं पुण्याकडे साफ दुर्लक्ष, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा गंभीर आरोप
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 6:27 PM

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केलीय. दरम्यान, राज्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक बनत चाललं आहे. अशावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. (Pune Mayor Murlidhar Mohol Alligation on state Government about remdesivir)

राज्य सरकार पुण्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्याचं अन्न व औषध प्रशासन झोपी गेलंय का? असा सवाल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारलाय. पुणे शहरात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटर्सचा मोठा तुटवडा भासत आहे. आम्ही रोज मागणी करतोय. पण त्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोहोळ यांनी केलाय. पुणे शहराला रेमडेसिव्हीर मोठ्या प्रमाणात लागत आहे. हे माहिती असतानाही त्याला पुरवठा केला जात नाही. रेमडेसिव्हीर आणि व्हेंटिलेटर संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिल्याची माहितीही मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्यातील व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकारविरोधात एल्गार

ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. या व्यापाऱ्यांनी आता राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे व्यापारी महासंघ उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील व्यापारी वर्गाने सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर अनेक आक्षेप नोंदवले आहेत. राज्यात संचारबंदी असेल तर मग शिवथाळी आणि रिक्षा सुरु ठेवण्याला परवानगी कशी काय देऊ शकता, असा सवाल व्यापारी महासंघाने विचारला आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी राज्यातील व्यापाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उच्च न्यायालयात जायचे की नाही, याचा अंतिम निर्णय होईल.

कोरोनाबाधितांवर उपचार करणारा डॉक्टर फक्त बारावी पास

अनेक शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी बेडही उपलब्ध होताना दिसत नाही. मात्र, या संकटाचा फायदा घेऊन काही विकृत लोक कोरोनाबाधितांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी याप्रकरणी बोगस डॉक्टराला बेड्या ठोकल्या आहेत.

पुण्यातील कोरोना स्थिती –

पुणे शहरात काल दिवसभरात 5 हजार 313 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 4 हजार 573 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यातील कालची मृतांची आकडेवारी अत्यंत चिंताजनक बनली आहे. 24 तासांत 73 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 18 रुग्ण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 54 हजार 61 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 1 हजार 86 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

नव्या आकडेवारीनुसार पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 3 लाख 39 हजार 823 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 79 हजार 906 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 856 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरातील रुग्णांचा आकडा 60 हजार पार, 281 जणांचा मृत्यू

Lockdown: पुण्यातील व्यापाऱ्यांचा ठाकरे सरकारविरोधात एल्गार; लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाण्याचा इशारा

Pune Mayor Murlidhar Mohol Alligation on state Government about remdesivir

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.