Pune crime : गुटखा अन् दारू तस्करांचा सुळसुळाट; पुरंदरच्या नीरा आणि मंचरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, वाचा…

गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे-नाशिक महामार्गावर अवैधरित्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणात येत होती.

Pune crime : गुटखा अन् दारू तस्करांचा सुळसुळाट; पुरंदरच्या नीरा आणि मंचरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, वाचा...
जप्त केलेल्या गुटख्यासह मंचर पोलीस
Image Credit source: tv9
सुनिल थिगळे, प्रतिनिधी

| Edited By: प्रदीप गरड

Jun 18, 2022 | 11:04 AM

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाने बुधवारी दारू तस्करांच्या आंतरराज्यीय रॅकेटचा (Interstate racket of Liquor smugglers) पर्दाफाश केला. पुणे ग्रामीण भागातील पुरंदर तालुक्यातील नीरा येथून 66 लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. याप्रकरणी एकाला अटकही (Arrest) करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ही दारू गोव्यात उत्पादित करण्यात आली होती आणि ती गोव्यातच विकायची होती, अशी पुष्टी अधिकाऱ्यांनी दिली. माहितीच्या आधारे नीरा-लोणंद रस्त्यावर हॉटेल न्यू प्रसन्नाजवळ सापळा (Trap) रचण्यात आला होता. त्यानुसार एक कंटेनर ट्रक जप्त करण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले, की दारूच्या बाटल्या एका ट्रकवर भरलेल्या मळणी यंत्रात (शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या) बनवलेल्या विशेष पोकळीत लपवून ठेवल्या होत्या.

66 लाख रुपयांची दारू

जप्त केलेल्या दारूची किंमत 66 लाख रुपये आहे आणि वाहनांसह जप्त केलेल्या मालाची किंमत 91.77 लाख रुपये आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमधील मळणी यंत्रातील एका पोकळीत या सर्व दारूच्या बाटल्या लपवल्या होत्या. चालकाला आधी विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे तो देऊ लागला. मात्र अधिक तपास केला असता दारूच्या बाटल्या मिळून आल्या. प्रवीण परमेश्वर पवार (23, रा. सोलापूर जिल्ह्यातील तांबोळे गाव) असे ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

मंचरमध्ये गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त

दुसऱ्या एका कारवाईत गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे-नाशिक महामार्गावर अवैधरित्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणात येत होती. या टेम्पोवर कारवाई करत 21 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता मंचर पोलीस करीत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें