‘विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’, अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे मागणी

पुणे अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, विनापरवानगी पोर्शे वाहन वितरीत करण्याऱ्या वितरकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे.

'विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा', अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे मागणी
अंबादास दानवे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 8:09 PM

“पुणे अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच विनापरवानगी पोर्शे वाहन वितरीत करण्याऱ्या वितरकावर कडक कारवाई करावी”, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुणे शहरातील कल्याणीनगर भागातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने 19 मे ला पहाटे उशिरापर्यंत पार्टी करून मद्यधुंद अवस्थेत एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्ता या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. यामध्ये अग्रवाल यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला वाहन परवाना नसतानाही वाहन चालविण्यास दिल्याने दोन निरापराध व्यक्तींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या विशाल अग्रवाल यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

सदरचे पोर्शे वाहन हे परराज्यातून आणले असून त्याची नोंदणी झालेली नाही. तसेच वाहन क्रमांक देखील देण्यात आलेला नाही. वाहनाचा वाहनकर सुद्ध भरण्यात आलेले नाही. तरी देखील २- ३ महिन्यांपासून सदरचे वाहन वापरात होते या वाहनावर संबंधित परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई केली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावरही नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

‘त्या’ पबवर कडक कारवाई करून परवाने रद्द करण्याची मागणी

अल्पवयीन मुलांना मद्यपान पुरविणाऱ्या पबवर कडक कारवाई करून परवाने रद्द करावे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. “ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाने पार्टी करून मद्यपान केले अशा कोझी पबमध्ये आणि ब्लॅक पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलांना मद्य दिले जाते. त्यामुळे या पबवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, पुणे शहरात मोठया प्रमाणात महाविद्यालयीन मुले पबमध्ये जात असून ते अल्पवयीन आहेत की नाही याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे अशा सर्व पबची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या पुणे शहरातील सर्व पब आणि बारवर कारवाई करुन पबचे परवाने रद्द करण्यात यावेत”, अशीदेखील मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

“पोर्शे कंपनीच्या वितरकाने विना नोंदणी आणि विना क्रमांक वाहन ग्राहकाला वापरण्यात दिले आहे. सदरची बाब गंभीर असून याची चौकशीही करण्यात यावी. अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिस ठाण्यात व्ही. आय. पी. वागणूक देवून घाईघाईने त्याला जामीन मिळण्यास मदत केल्याची चर्चा आहे.त्यामुळे यासंबंधी दोषी अधिकाऱ्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देखील कारवाई तातडीने करण्यात यावी”, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. तसेच यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने पावले उचलावीत, अशी सूचना दानवे यांनी उपरोक्त पत्रात केली आहे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...