Pune crime : बेव सिरीज पाहून काढला तरुणाचा काटा, प्रेमात अडसर ठरत असल्यानं झाडल्या पिस्तुलातून गोळ्या; खराडीतला संतापजनक प्रकार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी सांगितले, की आरोपींनी मोबाइलवर गुन्हेगारीशी संबंधित क्राइम वेब सिरीज, चित्रपट तसेच मालिका पाहिली होती. ती पाहूनच या आरोपींनी अक्षयच्या हत्येचा कट रचला.

Pune crime : बेव सिरीज पाहून काढला तरुणाचा काटा, प्रेमात अडसर ठरत असल्यानं झाडल्या पिस्तुलातून गोळ्या; खराडीतला संतापजनक प्रकार
इंदापूरमध्ये पोलिसाच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 3:04 PM

पुणे : प्रेमात अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून (Murder of Youth) केल्याचा संतापजनक प्रकार खराडीत घडला आहे. खराडी येथे कचरा वेचण्यासाठी गेलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडून (Firing) त्याचा खून करण्यात आला होता. या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने त्याचा खून करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने याप्रकरणी दोघांना सोलापूर (Arrested from Solapur) येथून अटक केली आहे. संतोष सत्यवान शिंदे (वय 28, बिदर, कर्नाटक, मूळ रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर) आणि संग्राम ऊर्फ बाबू राजू बामणे (रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अक्षय प्रकाश भिसे (वय 26, रा. दिनकर पठारे वस्ती, खराडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सीसीटीव्हीची तपासणी

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय भिसे या खराडी येथे राहणाऱ्या तरुणाचा 21 ऑगस्ट रोजी सकाळी कचरा वेचण्यासाठी गेला असता दोघांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि त्याचा खून केला होता. याच प्रकरणाचा समांतर तपास चंदननगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाकडूनही सुरू होता. खुनाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासले.

वेब सिरीज पाहून रचला कट

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी सांगितले, की आरोपींनी मोबाइलवर गुन्हेगारीशी संबंधित क्राइम वेब सिरीज, चित्रपट तसेच मालिका पाहिली होती. ती पाहूनच या आरोपींनी अक्षयच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेश येथून पिस्तूलही खरेदी केले. पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून आरोपींना बेड्या ठोकल्या.

हे सुद्धा वाचा

पोलीस पथकाची कारवाई

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, राजस शेख, हरीश मोरे, प्रवीण भालचिम, सारस साळवी, अशोक शेलार यांच्या पथकाने केली. आरोपी आणि मृतांमध्ये इतर काही वाद होते का, पिस्तूल कोणाकडून घेतले, आरोपींचे आधीचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, या सर्व अंगाने पोलीस तपास करीत आहेत.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.