Pune Metro : विरोधकांना घेरत नरेंद्र मोदी यांनी मांडले पुणे अन् राज्याच्या विकासाचे मॉडेल
PM Naredra Modi Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन केले. प्रधानमंत्री आवास योजनेचे लोकार्पण केले. आपल्या भाषणातून विकासाचे मॉडेल मांडत विरोधकांना घेरले.

पुणे | 1 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड गरवारे कॉलेज स्टेशन से रूबी हॉल या दोन योजनांचे लोकार्पण मंगळवारी झाले. यावेळी पिंपरी चिंचवडमधील प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्घाटन त्यांनी केले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांना घेरले. मोफत देण्याच्या घोषणांमुळे देशाच्या आणि राज्याच्या विकासाला खिळ बसत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी कर्नाटक आणि राजस्थानचे उदाहरण दिले. या राज्यांकडे विकासासाठी पैसा नसल्याचा दावा त्यांनी केला.
पुणे विकासाचे मॉडेल
स्वातंत्र्याच्या आंदोलनात पुणे शहराचे मोठे योगदान होते. अनेक क्रांतीकारी पुणे शहराला दिले. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे हे शहर आहे. पुणे सारख्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाचा दर्जा अधिक चांगला व्हावा यासाठी आमचे सरकार सतत काम करत आहे. पाच वर्षांपूर्वी पुणे शहरात मेट्रो नव्हती. आता २४ किलोमीटर मेट्रो झाली. मेट्रोमुळे प्रदूषण कमी होणार आहे. कोणत्याही शहराच्या विकासासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्वात महत्वाचे आहे. पुण्याचा विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम आमचे सरकार करत असल्याचे मोदी यांनी सांगितले.
देशाचा विकास अन् राज्याचा विकास
देशात २०१४ पूर्वी २०० किलोमीटरपेक्षा कमी मेट्रोचे नेटवर्क होते. आता ८०० किलोमीटर मेट्रो झाली आहे. तसेच अजून एक हजार किलोमीटरवर मेट्रो मार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. पूर्वी पाच शहरात मेट्रो होती. आता देशात २० शहरात मेट्रो सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील पुणे, नागपूरमध्ये मेट्रो नेटवर्क सुरु झाले आहे. आधुनिक भारतासाठी मेट्रो नवीन लाईफलाईन झाली. मेट्रोमुळे प्रदूषण कमी होता. त्यामुले मेट्रोचा विस्तार गरजेचा आहे. यामुळे आमचे सरकार मेट्र नेटवर्क वाढवण्यासाठी मेहनत करत आहे. देशाचा विकास झाल्यास राज्याचा विकास होतो आणि राज्याचा विकास झाल्यास देशाचा विकास होतो, हे सूत्र मोदी यांनी सांगितले.




रेल्वेचा विकासावर १२ पट अधिक खर्च
राज्य सरकार पायाभूत सुविधांवर मोठा भर देत आहे. महाराष्ट्रात मोठमोठे प्रकल्प उभे राहत आहे. रेल्वेच्या विकासासाठी २०१४ च्या तुलनेत १२ पट अधिक खर्च केला जात आहे. राज्यातील शहरे इतर राज्यातील शहरांना जोडले जात आहे. लोक आता देशाच्या विकासाची चर्चा करत आहे. या विकासाचा लाभ राज्याला होत आहे. पुणे शहरापर्यंत त्याचा लाभ येत आहे. राज्यात पूर्वी फक्त शेकडे स्टार्टअप होते. आता एक लाख स्टार्टअप तयार झाले. आम्ही डिजिटल पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत. जगात सर्वात वेगाने 5G नेटवर्क भारतात उभारले गेले आहे.
हा पायंडा चुकीचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कर्नाटक सरकावर टीका केली. या ठिकाणी चुकीचा घोषणा करुन काँग्रेसने सत्ता मिळवली. आता त्यांच्याकडे बंगळुरुच्या विकासासाठी पैसा नाही. त्याठिकाणी विकासाची सर्व कामे ठप्प झाली आहेत. राजस्थानमध्येही तिच परिस्थिती आहे. देशाला पुढे आणण्यासाठी नीती, नियत आणि निष्ठा महत्वाची आहे. सत्ता येते आणि जाते, परंतु समाज आणि देश तेथेच राहतो. यामुळे आमचा प्रयत्न तुमचा आज आणि उद्या चांगला करण्याचा आहे.