नेतेच सरकारशी सहमत असतील तर मराठ्यांना नेता कसा मिळणार?; नरेंद्र पाटलांचा खासदार संभाजी छत्रपतींना सवाल

जे लोक चळवळ करत आहेत. चळवळीचे नेते आहेत. ज्यांच्याकडून समाजाची अपेक्षा आहेत असे नेतेच जर सरकारशी सहमत होत असतील तर मराठ्यांना नेता कसा मिळणार?. (narendra patil)

नेतेच सरकारशी सहमत असतील तर मराठ्यांना नेता कसा मिळणार?; नरेंद्र पाटलांचा खासदार संभाजी छत्रपतींना सवाल
sambhaji chhatrapati
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 3:07 PM

पुणे: जे लोक चळवळ करत आहेत. चळवळीचे नेते आहेत. ज्यांच्याकडून समाजाची अपेक्षा आहेत असे नेतेच जर सरकारशी सहमत होत असतील तर मराठ्यांना नेता कसा मिळणार?, असा सवाल माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी खासदार संभाजी छत्रपती यांना केला आहे.

नरेंद्र पाटील हे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना त्यांनी हा सवाल केला. महाविकास आघाडी सरकार चांगल काम करतंय म्हणून संभाजीराजेंनीच कौतुक केलं होतं. कोल्हापूरला सारथीचं केंद्र, नाशिकला सारथीचं केंद्र होणार होतं. त्याचं पुढे काय झालं माहिती नाही. तरीपण छत्रपती संभाजीराजे महाविकास आघाडीशी सहमत आहेत. चळवळीचं नेतृत्व करणारे लोकचं सरकारशी सहमत आहेत तर मराठ्यांना नेता मिळणार कसा?, असा सवाल पाटील यांनी केला.

नेतृत्व कोणी करायचे?

छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांना दोनवेळा एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रश्न फक्त नेतृत्व कोणी करायचा हा आहे. मात्र, दोन्ही राज्यांना येत्या काळात एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

दोन्ही राजांना आवाहन

आज मराठा महासंघाची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत रस्त्यावरची लढाई लढण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. महाविकास सरकारने सारथीची फसवणूक केली आहे. अजित पवारांनी सारथीला अवघे 12.50 कोटी रुपये दिले आहेत. महाविकास आघाडी सरकार मराठ्यांचा विरोधी आहे का? छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजेंनी ठरवलं पाहिजे की महाविकास आघाडी सरकार आपलं गैरफायदा घेतंय. त्यांनीच ठरवून आता रस्त्यावर उतरलं पाहिजे, असं आवाहनच त्यांनी दोन्ही राजेंना केलं.

सरकारला मराठा समाजा बद्दल आस्था नाही’

महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजा बद्दल आस्था नाही, हे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 2021 – 2022 सालाकरिता फक्त साडे बारा कोटी रुपये तरतूद करुन दाखवुन दिलं आहे, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलाय. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे साडे बारा कोटी रुपये एक सप्टेंबरला वर्ग करत असल्याचं एक परिपत्रक मला मिळालं आहे, अशी माहिती पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी दिली होती.

राज्यातील 30 हजार युवा उद्योजकांना या योजनेतून 200 कोटी रुपयांचं कर्ज वाटत करण्यात आलेलं आहे. दर महिन्याला 8 कोटी, तर दरवर्षी 96 कोटी रुपये व्याज परतावा केला जातो. या योजनेसाठी राज्य शासनाकडून केवळ साडे बारा कोटींची तरतूद केल्याने उद्योजक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का? ते मराठा समाजाबद्दल ब्र सुध्दा काढत नाहीत, अशी खंतही नरेंद्र पाटील यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या:

Photo Story: काहीच राहिलं नाही… पाणीच पाणी आहे…; देवेंद्र फडणवीसांची अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी

Photo : अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त; देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर, शेतकऱ्यांचा टाहो सरकार कधी ऐकणार?

फडणवीसांची भेट घेतली, रडत रडत शिवसेना सोडली, भाजपमध्ये प्रवेश करताना सुभाष साबणेंना उद्धव-बाळासाहेबांची आठवण!

(narendra patil raise question to sambhaji chhatrapati over maratha community leadership)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.