नैतिकता शिल्लक असेल तर खासदारकी सोडा आणि अभिनय क्षेत्रात जा, रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर हल्लाबोल

चित्रपटात तुम्हाला रिटेकची संधी असते. मात्र, अमरावतीची जनता नवनीत राणा यांना रिटेकची संधी देणार नाही, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले. | Navneet Rana Rupali Chakankar

नैतिकता शिल्लक असेल तर खासदारकी सोडा आणि अभिनय क्षेत्रात जा, रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर हल्लाबोल
नवनीत कौर राणा, रुपाली चाकणकर
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 3:43 PM

पुणे:  नवनीत राणा यांच्यात थोडीशीही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आपल्या खासदारकीचा तातडीने राजीनाम द्यायला हवा. यानंतर त्यांनी राजकारण सोडून अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली. (NCP leader Rupali Chakankar take a dig at MP Navneet Rana)

उच्च न्यायालयाने मंगळवारी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन त्यांच्यावर निशाणा साधला. नवनीत राणा यांना अजूनही रिल लाईफ आणि रिअल लाईफमधील फरक समजलेला नाही. अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनतेची नवनीत राणा यांनी फसवणूक केली आहे. चित्रपटात तुम्हाला रिटेकची संधी असते. मात्र, अमरावतीची जनता नवनीत राणा यांना रिटेकची संधी देणार नाही, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले.

त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असा सल्ला रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणांना दिला.

खासदार नवनीत राणा यांना धक्का, जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द

युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. नवनीत राणा या 2019 साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या हेविवेट नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul ) यांचा पराभव केला होता.

शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना हायकोर्टानं 2 लाखांचा दंडदेखील सुनावला आहे.

संबंधित बातम्या: 

खासदार नवनीत राणा यांना धक्का, जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द

हरभजन सिंग यांची मुलगी, रवी राणांची बायको, नवनीत राणांच्या सर्टिफिकेटवर जात कोणती?

मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती, नवनीत राणा राजधानीत कडाडल्या

(NCP leader Rupali Chakankar take a dig at MP Navneet Rana)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.