राज्यात मध्यावधी निवडणुका होणार?, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?; वाचा!
राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्याने पुन्हा एकदा आपणच सत्तेत येणार असल्याचं सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडूनही त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. (no mid-term polls in maharashtra says sunil tatkare)

पुणे: राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्याने पुन्हा एकदा आपणच सत्तेत येणार असल्याचं सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडूनही त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधकांचं म्हणणं फेटाळून लावलं आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार हे केवळ राजकीय भाष्य आहे. यामध्ये फारसं काही नाही, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
सुनील तटकरे आज पुण्यात आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. यावेळी त्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीवर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशा आपत्ती आल्या. मात्र त्यांनाही अशी मदत करता आली नाही. केंद्र सरकारने निकष बदलून राज्याला मदत करावी, असं तटकरे म्हणाले.
राजकीय काहीच नाही
शरद पवार आणि नितीन गडकरीमंध्ये मुंबई-गोवा महामार्गाबाबत चर्चा झाली. आजची बैठक ही फलद्रुप झाली. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न लवकरच निकाली निघेल, असं सांगतानाच शरद पवार आणि नितीन गडकरी एकत्रित प्रवास करत आहेत. यावेळी मराठवाड्यातील नुकसानसंदर्भात चर्चा होऊ शकते. या दोन्ही नेत्यांच्या आजच्या बैठकीत राजकीय काही नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दिल्लीत गडकरींसोबत बैठक
शरद पवार आणि नितीन गडकरींमध्ये वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा झाली. पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भात संदर्भातही चर्चा झाली, विमानतळासमोरची 12 एकर जागा मिळावी आणि कार्गोची तीन एकर जागा मिळण्यासंदर्भात चर्चा झाली. गडकरी हे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष आहेत. लवकरचं दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल. मी आज नितीन गडकरींना पत्र दिलंय, असं भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितलं.
पवार-गडकरी नगरला
दरम्यान, विकासकामांच्या भूमिपूजना निमित्त शरद पवार आणि नितीन गडकरी नगरमध्ये गेले आहेत. दोघेही एकाच हेलिकॉप्टरमधून गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नगर-करमाळा-टेंभुर्णी या चौपदरी रस्त्यासाठी मोठा निधी, सावळीविहीर ते अहमदनगर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४९६ कोटी, अहमदनगर- भिंगार या १८ किलोमीटर रस्तारुंदीकरणासाठी ३५ कोटी रुपये, तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामांसाठी ८४ कोटी रुपये खर्च होत आहे. या कामांचे भूमिपूजन होणार आहे. अहमदनगर-दौड-वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर-कडा-आष्टी-जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्ता मजबुतीकरण व कोपरगाव-वैजापूर रस्ता मजबुतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, त्यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथे मुख्य कार्यक्रम होत आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 02 October 2021 https://t.co/wlr86RpD8v #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 2, 2021
संबंधित बातम्या:
काँग्रेस पक्ष हेडलेस, भाजप फायदा घेतंय, अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावा; संजय राऊतांचा सल्ला
गडकरी पवारांचा एकत्रित हवाई प्रवास, विखे स्वागताला सज्ज, नगरच्या कार्यक्रमाकडे महाराष्ट्राचं लक्ष!
(no mid-term polls in maharashtra says sunil tatkare)
