AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हसन मुश्रीफांना पाया पडून नमस्कार, रोहित पवारांच्या हातात हात, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुजय विखेंकडून जंगी स्वागत

सुजय विखे यांनी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले तर रोहित पवार यांना हँडशेक करुन त्यांची खुशाली विचारली. हेलिपॅडवर शरद पवार आणि नितीन गडकरींचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेते कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

हसन मुश्रीफांना पाया पडून नमस्कार, रोहित पवारांच्या हातात हात, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं सुजय विखेंकडून जंगी स्वागत
सुजय विखे यांच्याकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी स्वागत
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 10:59 AM
Share

अहमदनगर : आज नगरमध्ये महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीचं दर्शन घडलं. अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी स्वागत केलं. शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागताला नगरमधील सगळे राजकीय नेते हेलिपॅडवर जमले होते. त्यावेळी सुजय विखे यांनी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले तर आमदार रोहित पवार यांना हँडशेक करुन त्यांची खुशाली विचारली. (MP Sujay Radhakrishna Vikhe patil Warm Welcome NCp leader Sharad pawar Rohit pawar hasan Mushriff

राजकारणातील पारंपारिक कट्टर विरोधक एकाच मंचावर येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे आज शनिवारी नगरमधील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसणार आहेत. तत्पूर्वी गडकरी आणि शरद पवार यांची पुणे विमानतळावर भेट झाली. दोघांमध्ये विकासकामांच्या संदर्भाने जवळपास अर्धा तास चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेते नगरकडे एकाच हेलिकॉप्टरने रवाना झाले. पावणे अकराच्या आसपास त्यांचं नगरमध्ये आगमन झालं.

सुजय विखेंकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जंगी स्वागत

हेलिपॅडवर शरद पवार आणि नितीन गडकरींचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेते कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, तर राष्ट्रवादीकडून मंत्री हसन मुश्रीफ, संग्राम जगताप, रोहित पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत गप्पा मारल्या, काही वेळ हास्यविनोदात देखील दंग झाले.

राजकारणाच्या नगर पॅटर्नची महाराष्ट्रात नेहमी चर्चा असते. राज्यात कशीही परिस्थिती असली तरी इथलं राजकारण काहीतरी वेगळं असतं. आजही कट्टर विरोधक असलेले पवार-विखे-गडकरी एकाच मंचावर य़ेत आहेत. या सोहळ्याकडे नगरसह महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा होत आहे. याच सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार, नितीन गडकरी आणि विखे परिवार एकाच मंचावर येणार आहे. आज 10.45 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाकडे नगरचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलं आहे.

नगर परिसरातील कोणकोणत्या विकासकामांचं भूमीपूजन?

नगर-करमाळा-टेंभुर्णी या चौपदरी रस्त्यासाठी मोठा निधी, सावळीविहीर ते अहमदनगर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४९६ कोटी, अहमदनगर- भिंगार या १८ किलोमीटर रस्तारुंदीकरणासाठी ३५ कोटी रुपये, तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामांसाठी ८४ कोटी रुपये खर्च होत आहे.

या कामांचे भूमिपूजन होणार आहे. अहमदनगर-दौड-वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर-कडा-आष्टी-जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्ता मजबुतीकरण व कोपरगाव-वैजापूर रस्ता मजबुतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, त्यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथे मुख्य कार्यक्रम होत आहे.

हे ही वाचा :

गडकरी पवारांचा एकत्रित हवाई प्रवास, विखे स्वागताला सज्ज, नगरच्या कार्यक्रमाकडे महाराष्ट्राचं लक्ष!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.