पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी; पवना धरण 100 टक्के भरले

Pawna Dam | पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये पवना धरणक्षेत्रात 29 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात 0.86 टक्क्यांची भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी; पवना धरण 100 टक्के भरले
पवना धरण

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसराला पाणीपुरवठा कणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये पवना धरणक्षेत्रात 29 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात 0.86 टक्क्यांची भर पडली आहे. 1 जूनपासून या क्षेत्रात एकूण 2215 मिमी पाऊस बरसला आहे. गेल्यावर्षीही 5 सप्टेंबरपर्यंत पवना धरण काठोकाठ भरले होते. (Pawna Dam in Maval)

कोकणातील 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी रिमझिम पाऊस झाला. राज्याच्या काही भागांतही पावसाने हजेरी लावली. येत्या 48 तासांत उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आज रविवारी कोकणातील दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

रविवारसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

पुढचे चार दिवस राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून वापसीचे संकेत मानले जात आहेत. राज्या आजपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांत उद्या अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात येत्या 4 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात येत्या 4 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात 6 आणि 7 सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

नागपुरात धरणांची पातळी खालावलेली शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस बरसत असला तरी नागपूरसह विदर्भात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाऊ शकते. त्यामुळे शेतीसाठी धरणांमधून पाणी सोडता येईल का, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.

हे ही वाचा :

Mumbai Rains Maharashtra Weather : दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस, राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी

(Pawna Dam in Maval)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI