AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युगेंद्र पवार राजकारणात येणार?; रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Rohit Pawar on Yugendra Pawar May Be Inter in NCP Sharad Pawar Group : युगेंद्र पवार राजकारणात एन्ट्री करणार?; रोहित पवार म्हणाले, युगेंद्र जर म्हणत असतील तर... बारामती लोकसभेतील लढतीवरही रोहित पवार बोलले आहेत. ते नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर....

युगेंद्र पवार राजकारणात येणार?; रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
| Updated on: Feb 21, 2024 | 1:26 PM
Share

रणजित जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड | 21 फेब्रुवारी 2024 : अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. आज बारमतीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यलयात युगेंद्र पवार गेले होते. तिथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यामुळे युगेंद्र पवार हे राजकारणात येणार का? याची चर्चा रंगली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच बारामतीत जर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली तर काय होणार? यावरही रोहित पवारांनी भाष्य केलंय.

रोहित पवार काय म्हणाले?

युगेंद्र पवार आज बारामतीच्या आमच्या कार्यालयात गेले आहेत. ते कार्यकर्त्यांशी काय बोलले हे पहावं लागेल. युगेंद्र पवार म्हणत असतील शरद पवार साहेब तसं… म्हणजे याचं स्वागत करायला हवं. आमच्या सारख्या लहानांना हे कळतंय, की पवारसाहेबांना साथ देण्याची गरज आहे, असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवार घरातच एकटे पडलेत का अशी चर्चा होत आहे. यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलंय. अजित दादा सध्या कुटुंबात एकटे आहेत, असं चित्र आहे. पण ते सध्या ते स्वतःसाठी आणि मलिदा गॅंग साठी बोलतात, असं रोहित पवार म्हणाले.

पार्थ पवार शिरूर लोकसभा लढणार?

मी पुन्हा येईननंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार म्हणतात… आता अमोल कोल्हे यांच्या विरोधात पार्थ पवारही उमेदवार असू शकतो. मात्र अजित दादांना महायुतीत चार जागा मिळतील, पण त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही. साहेब काय बोलतील हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळं आजच्या सभेत ते काय बोलतील याची उत्सुकता आहे, असं रोहित पवार म्हणाले.

बारामतीत नणंद विरूद्ध भावजय लढत होणार?

बारामती लोकसभेत काकी विरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आत्तापर्यंत राजकारणात नव्हत्या,. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी लढत होणात, म्हणून अजित दादांविरोधात बोलू, असं रोहित पवार म्हणाले.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.