AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi Visit Dehu : पंतप्रधान मोदींसाठी बनवलेल्या खास पगडीवरील अभंगात बदल, मंदिर देवस्थानचा निर्णय

पंतप्रधान मोदींसाठी बनवलेल्या खास पगडीवरील अभंगात बदल करण्यात आला आहे. मंदिर देवस्थानाच्या वतीने पंतप्रधानांना तुकोबांची पगडी देण्यात येणार आहे. त्यावरच्या अभंगात बदल करण्यात आला आहे.

PM Narendra Modi Visit Dehu : पंतप्रधान मोदींसाठी बनवलेल्या खास पगडीवरील अभंगात बदल, मंदिर देवस्थानचा निर्णय
| Edited By: | Updated on: Jun 14, 2022 | 10:55 AM
Share

पुणे : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांची जन्मभूमी असलेल्या देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narndra Modi) येणार आहेत. इथं त्यांच्या हस्ते शिळा आणि मंदिर लोकापर्ण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंरप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने त्यांना तुकोबांची पगडी भेट म्हणून देण्यात येणार आहे. पण या पगडीवर लिहिण्यात आलेला अभंग बदलण्यात आला आहे. या अभंगात बदल करण्यात आला असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय.

अभंगात बदल

पंतप्रधान मोदींसाठी बनवलेल्या खास पगडीवरील अभंगात बदल करण्यात आला आहे. मंदिर देवस्थानाच्या वतीने पंतप्रधानांना तुकोबांची पगडी देण्यात येणार आहे. त्यावरच्या अभंगात बदल करण्यात आला आहे.

आधीचा अभंग

पंतप्रधानासाठी पुण्यातील फेटेवाल्याने खास पगडी तार केली आहे. त्यावर याआधी ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणो काठी…’ हा अभंग लिहिला होता. पण आता यात बदल करण्यात आला आहे.

आताचा अभंग

‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ…’ हा अभंग लिहिलेली पगडी आता पंतप्रधानांना देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच देहूनगरी येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उपरणं, पगडी, टाळ, चिपळ्या, तुळशीची माळ आणि वीणा भेट देत पंतप्रधानांचं स्वागत केलं जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकर्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.दुपारी एक वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुण्यात आगमन होईल. त्यानंतर पावणे दोन वाजेच्या सुमारास देहू येथील हेलिपॅडवर त्यांचं आगमन होईल. दुपारी दोन वाजता देहू येथील संत तुकाराम मंदिराज शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रदानांच्या हस्ते केलं जाईल. तत्पूर्वी श्री संत तुकाराम महाराज मंदिराबाहेर वारकऱ्यांकडून पंतप्रधानांचं स्वागत केलं जाईल. मंदिरात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन, ध्वजपूजन, श्रीराम दर्शन, महादेव दर्शन घेतील. मुख्य कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजा केली जाईल. त्यानंतर मंदिर कोनशीला अनावरण, अभंग गाथा दर्शन घेतले जाईल. त्यानंतर सभास्थळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होईल आणि पुण्यातील कार्यक्रमाचा समारोप होईल.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.