AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune murder : डोक्यात दगड घालून रांजणगावात मित्राची हत्या; पोलिसांनी दोन तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या

रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुनाच्या (Murder) गुन्ह्यामधील आरोपीस दोन तासाच्या आत अटक (Arrest) करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (Crime Branch) पुणे ग्रामीण व रांजणगाव पोलीस स्टेशनने ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

Pune murder : डोक्यात दगड घालून रांजणगावात मित्राची हत्या; पोलिसांनी दोन तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या
रांजणगावातील खूनप्रकरणी पोलिसांनी केलं आरोपीला अटकImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 15, 2022 | 11:25 AM
Share

पुणे : रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुनाच्या (Murder) गुन्ह्यामधील आरोपीस दोन तासाच्या आत अटक (Arrest) करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (Crime Branch) पुणे ग्रामीण व रांजणगाव पोलीस स्टेशनने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात चार मित्र पत्ते खेळत असताना त्यांच्यात पैशांचा वाद झाला. या पैशांच्या वादावरून प्रमोद मुंद्रिका पांडे याने गजानन शंकर सोनाग्रे याची डोक्यात दगड घालून हत्या केली. क्षुल्लक कारणावरून मित्राची हत्या करून नंतर हा आरोपी पसार झाला होता. या आरोपीचा अवघ्या दोन तासांत स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलिसांनी तपास करत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी रांजणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात या आरोपीला देण्यात आले आहे.

रांजणगाव पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मित्र पत्ते खेळत होते. यावेळी त्यांच्यात पैशावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की आरोपी प्रमोद पांडे याने त्याचा मित्र गजानन सोनाग्रे याच्या डोक्यात दगड घातला. यात गजानन सोनाग्रे याचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर आरोपी प्रमोद पांडे घटनास्थळावरून पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याच्या दोन तासांतच मुसक्या आवळल्या. रांजणगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आणखी वाचा :

Pune crime : मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक करून रुग्णाच्या जीवाशी खेळ! ‘ससून’च्या अधीक्षकांचं निलंबन

Aurangabad | मराठवाड्यात डिझेल चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीचा भांडाफोड, 6 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

Aurangabad | मैत्रीणीच्या नावाने इंस्टा अकाउंट, मित्र-मैत्रीणींशी चॅटिंग, औरंगाबाद पोलिसांनी उघडा पाडला बनाव!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.