AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धनंजय चंद्रचूड यांनी लोकशाहीचा गळा घोटला’; पृथ्वीराज चव्हाण यांची खोचक टीका

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर खोचक टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएमबाबतही शंका व्यक्त केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे आणि १०० टक्के व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी केली आहे.

'धनंजय चंद्रचूड यांनी लोकशाहीचा गळा घोटला'; पृथ्वीराज चव्हाण यांची खोचक टीका
prithviraj chavan
| Updated on: Dec 02, 2024 | 7:46 PM
Share

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. “माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या. पण निर्णय न घेऊन त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. “पक्षांतर बंदी कायद्याचा सर्वात मोठा निर्णय होता, तो झाला नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच “लोकशाहीचा जर खून झाला तर संविधानाला काही अर्थ राहणार नाही”, असंदेखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “भारतीय लोकशाही बळकट असली पाहिजे असं सर्वांचं मत आहे. प्रत्येकाच्या मनात ईव्हीएमबद्दल शंका आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मोदींनी निवडणूक आयुक्त नेमण्याचा कायदा बदलला. तक्रार करायची कोणाकडे? निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. पण त्यांच्यावर विश्वास राहिला नाही”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

पृथ्वीराज चव्हाण काय-काय म्हणाले?

“या देशातील लोकशाही सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण काम करतोय. त्या लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झालाय. विधानसभा निकाल अनपेक्षित लागले. आणीबाणीबद्दल अनेक वेळा काँग्रेसने माफी मागितली आहे. या निवडणुकीत विरोधात वातावरण नव्हतं. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. हरियाणा आणि महाराष्ट्रात जर भाजप विरोधात सत्ता गेली तर केंद्रातील सरकारला धोका होणार होता. निकाल लागल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. बाबा आढाव यांनी आंदोलन केलं. या देशात लोकशाही नांदतेय हे सिद्ध करणं निवडणूक आयोग आणि सरकारची जबाबदारी आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“माझा 2019 चा ईव्हीएमबद्दलचा माझा जुना व्हिडीओ दाखवला जातोय. ईव्हीएम मशीनमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर नाही अशी माझी माहिती आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम हॅक करता येणार नाही ,असं माझं मत त्यावेळी होतं. जगात अशी मशीन कुठेही निवडणुकीसाठी वापरली जात नाही. माझी मागणी अशी आहे, 100 टक्के VVPAT ची मोजणी करा. खर्च होईल, काही दिवस लागतील. पण हे करा. तुम्ही जर केलं नाही तर संशय वाढणार आहे”, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“1991 ला सोनिया गांधींनी इच्छा व्यक्त केली असती तर त्या पंतप्रधान झाल्या असत्या. त्यांनी पुढे 1999 ला पक्ष वाचवण्यासाठी जबाबदारी घेतली. 1991 ला आणि 2004 ला दोन वेळा सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकल्या असत्या. पण त्यांनी त्याग केला. नंतर खोटं लिहिलं गेलं फाईल सोनिया गांधींकडे जायच्या, हे सगळं खोटं आहे. मी 24 तास पंतप्रधान कार्यालयात असायचो. फाईलबद्दल बोललं गेलं ते अतिशय पोरकट आणि एका मीडिया सल्लागाराने खोडसाळपणे लिहिलं मी तिथं होतो. एकदा महत्वाचा निर्णय असेल तर विचारलं जात होतं. मी 6 वर्ष दिल्लीत असताना सोनिया गांधीना जवळून पाहिलं आहे. त्यांच्या कामाची पद्धत देखील पहिली. सोनिया गांधी चर्चा करून निर्णय घायच्या त्या आपला निर्णय कधी लादत नव्हत्या. माहिती अधिकार कायद्याला प्रणव मुखर्जीनी फार विरोध केला. मात्र सोनिया गांधींमुळे हा कायदा झाला”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.