AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे लोकसभेसाठी मनसेकडून वसंत मोरे की साईनाथ बाबर, शर्मिला ठाकरे यांनी दिले स्पष्ट संकेत

pune lok sabha vasant more and sainath babar | पुणे लोकसभा मतदार संघासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पातळीवर सुरु झाली आहे. राज ठाकरे यांचे पुणे दौरे वाढले आहेत. त्याचवेळी शर्मिला ठाकरे यांनी लोकसभेचा उमेदवार कोण असणार? याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.

पुणे लोकसभेसाठी मनसेकडून वसंत मोरे की साईनाथ बाबर, शर्मिला ठाकरे यांनी दिले स्पष्ट संकेत
vasant more and sainath babar
| Updated on: Feb 06, 2024 | 12:57 PM
Share

प्रदीप कापसे, पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2024 | केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका घेतल्या. त्यानंतर आयोगाकडून लोकसभेची तयारी सुरु झाली. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून तयारी सुरु आहे. त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभेची रणनिती तयार केली जात आहे. मनसेने पुणे लोकसभेसाठी जोरदार मोर्चाबांधणी केली आहे. पुणे लोकसभेसाठी राज ठाकरे स्वत: दौरे करत आहेत. तसेच राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांनाही जबाबदारी दिली आहे. मनसेकडून साईनाथ बाबर आणि वसंत मोरे या दोन्ही नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आता या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार त्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिले आहे. त्यासंदर्भात त्यांनी आज पुण्यात महत्वाचे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे

शर्मिला ठाकरे यांचं पुण्यातील कार्यक्रमात मोठं वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या, मार्च- एप्रिलला लोकसभा होतील. ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक होणार आहेत. तसेच पुढच्या वर्षी महापालिका निवडणुका होतील. मनसेने चांगले काम पुण्यात केले आहे. कोव्हीड काळात सत्ताधारी मंत्री बंगल्यात बसले होते तेव्हा मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत होते, अशी जोरदार टीका कोणाचे नाव न घेता शर्मिला ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर केली.

लोकसभा उमेदवारीबाबत स्पष्ट संकेत

मनसेचा पुण्यातील उमदेवार कोण असणार? त्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट संकेत दिले. त्या म्हणाल्या, साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल.

शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी लोकसभेत वसंत मोरे ऐवजी साईनाथ बाबर यांना पसंती दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे आता साईनाथ बाबर यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी वसंत मोरे यांनीही आपणास संधी मिळाल्यास लोकसभा लढण्यासाठी आपण तयार असल्याचे म्हटले होते. तसेच वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून पुण्यात बॅनर लागले होते.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....