कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना पुणे-लोणावळा लोकल प्रवासाची मुभा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 17, 2021 | 7:41 AM

Pune Lonavala Train | पुणे - लोणावळा मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी सध्या लोकलच्या चार फेऱ्या सुरू आहेत. दुसरा डोस होऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांनाही प्रवास करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना पुणे-लोणावळा लोकल प्रवासाची मुभा
पुणे-लोणावळा ट्रेन

पुणे: मुंबईनंतर पुणे ते लोणावळा मार्गावर लोकल प्रवासासाठी लसीचे दोन डोस झालेल्या प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. महापालिका किंवा नगरपरिषदेकडून त्यासाठीचे पासेस वितरीत केले जातील. त्यानंतर रेल्वेतर्फे त्यांना मासिक पास उपलब्ध करून देण्यात येईल.

पुणे – लोणावळा मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी सध्या लोकलच्या चार फेऱ्या सुरू आहेत. दुसरा डोस होऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांनाही प्रवास करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.

तर दुसरीकडे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील परिस्थिती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्हीट रेट पाच टक्क्यांहून कमी झाला आहे. त्यामुळे सरकारी निकषांनुसार या परिसरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, मद्यालये, व्यापारी संकुले रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील करोनाबाधितांचा दर कमी झाल्याने या दोन्ही शहरांतील निर्बंधांमध्ये यापूर्वीच शिथिलता देण्यात आली होती.

पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणाचा 12 लाखांचा टप्पा पूर्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणाचा 12 लाखांचा टप्पा नुकताच पूर्ण झाला होता. शुक्रवारी रात्रीपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 12 लाख 3 हजार 660 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले होते. यामध्ये 8 लाख 88 हजार 555 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 3 लाख 15 हजार 105 नागरिकांचा दुसराही डोस झाला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे सरासरी प्रमाण 30 टक्के इतके आहे.

झिकाच्या भीतीमुळे बेलसर ग्रामपंचायतने वाटले निरोध

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने सतर्क होत विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पुरुषांच्या विर्यात झिकाचे विषाणू आढळत असल्याने गर्भधारणा टाळण्यासाठी व सुरक्षित संभोग व्हावा यासाठी बेलसर गावात पुरुषांना निरोधचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने भोंगागाडीच्या माध्यमातून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. गावात सर्व ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे.

गावातल्या 24 गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले आहेत. महिलांच्या रक्ताचे नमुनेही तपासले असून त्यात कोणीही झिका ग्रस्त आढळलेले नाही असे डॉ. भरत शितोळे यांनी सांगितले. गावांमध्ये विविध पद्धतीच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून ग्रामपंचायतच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे गावचे उपसरपंच धीरज जगताप यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?

सीरमचे पुनावाला मोदी सरकारवर संतप्त, पुण्यासाठी लिहिलेल्या पत्राला उत्तर नसल्याचा दावा, वाचा नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI