Pune Corona update| आशियात महाराष्ट्र, तर पाकिस्तानपेक्षा पुण्यात रुग्णवाढ जास्त

एकट्या पुण्यात संपूर्ण पाकिस्तानपेक्षाही जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या तुलनेत पुण्याने पूर्ण पाकिस्तान देशाला मागे टाकले आहे. (pune corona update pakistan)

Pune Corona update| आशियात महाराष्ट्र, तर पाकिस्तानपेक्षा पुण्यात रुग्णवाढ जास्त
सांकेतिक कोरोना व्हायरस आणि इम्रान खान
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 5:44 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. वेळीच कोरोनाला थोपवता यावे म्हणून कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन केले जातेय.  मात्र, असे असूनदेखील कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतो आहे. मिळालेली ताजी आकडेवारी तर जास्तच धक्कादायक आहे. एकट्या पुण्यात (Pune corona) संपूर्ण पाकिस्तानपेक्षाही जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या तुलनेत पुण्याने पूर्ण पाकिस्तान देशाला मागे टाकले आहे. पुण्यात काल दिवसभर संपूर्ण पाकिस्तानात 3495 रुग्ण आढळले आहेत. तर एकट्या पुणे काल (शुक्रवार 20 मार्च) जिल्ह्यात 4973 रुग्णांची भर पडलीये. (Pune new corona patients are more than whole Pakistan new corona patient pune corona update)

पुण्यात पाकिस्तानपेक्षा जास्त रुग्ण

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशीच रुग्णवाढ राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येथे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, रुग्णसंख्या वाढल्यामुळे येथील आरोग्य प्रशासनाकडूनसुद्धा लसीकरण आणि कोरोना चाचाणीचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवला जातोय.

मात्र, मागील काही दिवसांतील कोरोना रुग्णवाढीची आकडेवारी ही धक्कादायक आहे. महाराष्ट्र हा देशातलाच नाही, तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून समोर येतोय. संपूर्ण पाकिस्तान देशात जेवढे रुग्ण आढळले त्यापेक्षा कितीतरी जास्त रुग्ण एकट्या पुण्यात आढळत आहेत. पाकिस्तानची एकूण लोकसंख्या 22 कोटी आहे. यापैकी पाकिस्तानात काल फक्त 3495 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर पुण्याची लोकसंख्या फक्त 1 कोटी असूनसुद्धा येथे कोरोनाचे तब्बल 4973 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे ही आडेवारी निश्चितच चिंता वाढवणारी आहे.

मुंबईमध्येही गंभीर परिस्थिती

पुणे जिल्ह्यातील ही कोरोनास्थिती समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणा चाचण्या केल्या जात नसतील अशी ओरड होऊ शकते. मात्र, हीच स्थिती मुंबईच्या बाबतीतसुद्धा लागू होतेय. एकट्या मुंबईमध्ये अनेक देशांच्या तुलनेत दुप्पट नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. काल 11 कोटी लोकसंख्या असलेल्या जपानमध्ये 1473 रुग्ण निघाले. 16 कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशमध्ये एकूण 2187 नवे कोरोना रुग्ण आढळले. साडे 3 कोटी नागरिक असलेल्या सौदी अरेबियात फक्त 381 नवे कोरोना रुग्ण सापडले. मात्र, एकट्या मुंबईत काल ( शुक्रवार 20 मार्च) तब्बल 2877 कोरोना रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, सध्या मुंबई आणि पुण्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. मात्र पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांत आरोग्य प्रशासन कोरोनाला थोपवण्यासाठी मोठी मेहनत घेत आहे. या दोन्ही शहरांत कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, नियमसुद्धा कडक करण्यात आले असून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. घाबरून न जाता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास कोरोनाचा संसर्ग रोखता येऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे.

इतर बातम्या :

Special Report : राज्यात कोरोनाचा उद्रेक, पण कोल्हापूरने कोरोनाला कसं थोपवलं?

(Pune new corona patients are more than whole Pakistan new corona patient pune corona update)
Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.