Kambal Baba : मुंबईत ‘कंबलबाबा’ची चर्चा, भाजपच्या आमदाराचंही नाव चर्चेत, अंनिसकडून कारवाईची मागणी

Mukta Dabholkar On Kambalbaba : 'कंबलबाबा'वर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करा; महाराष्ट्र अंनिसची सरकारकडे मागणी. अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्या मुक्ता दाभोलकर यांनी एका निवेदनाद्वारे सरकारकडे मागणी केली आहे. वाचा हे निवेदन नेमकं काय आहे..

Kambal Baba : मुंबईत 'कंबलबाबा'ची चर्चा, भाजपच्या आमदाराचंही नाव चर्चेत, अंनिसकडून कारवाईची मागणी
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 4:17 PM

पुणे | 14 सप्टेंबर 2023 : अनेकदा काही भोंदूबाबा चर्चेत येतात. त्यांच्याकडून काही विज्ञान विरोधी दावे केले जातात. त्यामुळे समाजाची दिशा चुकण्याची शक्यता असते. असाच एक भोंदूबाबा चर्चेत आला आहे. मुंबईत सध्या ‘कंबलबाबा’ची जोरदार चर्चा होत आहे. कंबल म्हणजेच घोंगडी अंगावर टाकून उपचार करत असल्याचं समोर आलं आहे. या विरोधात आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे. या भोंदूबाबावर कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात येत आहे. याबाबत एक निवदेन त्यांनी सरकारला दिलं आहे. यात त्यांनी एका भाजप आमदाराच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

कंबलबाबावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने केली आहे. आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर राजस्थानातील कंबलबाबा उपचार करत आहे. कंबलबाबा कंबल टाकून तथाकथित उपचार करत असल्याचे अनेक व्हिडिओ राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर बघायला मिळतात. भोंदूबाबा करत असलेल्या या उपचारांच्या वेळी स्वतः आमदार राम कदम तसेच पोलीस अधिकारी देखील उपस्थित असलेले दिसतात, यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी अंनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्या मुक्ता दाभोलकर यांनी ही मागणी निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे.

अंनिसचं निवेदन जसंच्या तसं

कंबलबाबांवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाईची, महाराष्ट्र अंनिसची मागणी

मुंबईतील आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार करणाऱ्या राजस्थानातील कंबल दाबांवर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागणी केली आहे.

कंबलबाबा या नावाने ओळखला जाणारा राजस्थानातील एक भटू बाबा आमदार राम कदम यांच्या आधाराने त्यांच्या मतदारसंघातील विकलांग लोकांवर कंबल टाकून तथाकथित उपचार करत असल्याचे अनेक व्हिडिओ राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर बघायला मिळतात. भोंदूबाबा करत असलेल्या या उपचारांच्या वेळी स्वतः आमदार राम कदम तसेच पोलीस अधिकारी देखील उपस्थित असलेले दिसतात. गेली 10 वर्षे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे;

या कायद्यानुसार स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणे, चमत्कार करण्याचा दावा करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. आजवर जवळपास 1000 पेक्षा अधिक भोंदू बाबांवर या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. वर उल्लेख केलेल्या कंबलबाबा या भोंदूबाबावर देखील पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा व पीडित व्यक्तींची ही क्रूर थट्टा थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.