Ravindra Dhangekar : शापातून वाचायचं असेल तर…रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना दिलेला सल्ला व्हायरल, नेमकं म्हणाले काय?
Pune News Update : शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधातील दारुगोळा संपलेला नाही. त्यांनी अजून ठेवणीतील बॉम्ब शाबूत असल्याचे सांगत वैयक्तिक टीका न करण्याचे आवाहन मोहोळ यांना केले आहे.

Ravindra Dhangekar on Murlidhar Mohol : शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी ऐन दिवाळीत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर तोफ डागली. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून दोघांतील शीतयुद्ध संपलेले नाही. आता धंगेकर यांनी मोहोळ यांना वैयक्तिक टीका न करण्याचे आवाहन केले आहे. नाहीतर मग अजून इतर प्रकरणं बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.
मोहोळांवर पुन्हा टीकेचा बाण
रवींद्र धंगेकर यांनी आज पुन्हा मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही त्यांची पद्धत आहे. ते म्हणाले माझ्यावरती एक ही गुन्हा नाही.सहा-सात तर गुन्हे त्यांच्यावरती आहेत. दलित बांधवा वरती अन्याय केलेला गुन्हा त्यांच्यावरची आहे.आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं उघडून अशी त्यांची पद्धत झाली आहे, असा टोला धंगेकरांना मोहोळांना लगावला.
या शापातून मुक्त व्हा
जैन धर्माचे गुरु तळतळून बोलत होते.जे या प्रकरणामध्ये असतील त्यांचा सत्यनाश होईल.असा कालच त्यांनी शाप दिला आहे. या शापामधून जर वाचायचं असेल तर जैन धर्माची जागा परत त्यांना द्यावी, असा सल्ला धंगेकरांनी मोहोळ यांना दिला. विशाल गोखले माझा मित्र अहो फोडण्यापेक्षा जे साधू तळतळीने बोलत होते. ते शाप देत होते तो शाप जर त्यांना लागायचा नसेल महावीरांचे मंदिर मुक्त झाले पाहिजे,असे धंगेकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक
काल रात्री मुरलीधर मोहोळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या भेटीत काय चर्चा झाली हे समोर आले नसले तरी सध्या गाजत असलेल्या जैन बोर्डिंग जमीन वादावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यावर धंगेकरांनी मोहोळ यांना चिमटा काढत फडणवीस यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलावलं असेल. देवेंद्र फडणवीस हे चाणक्ष राजकारणी आहेत. जैन धर्मिय कायमच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभे राहिले आहे.
साधू लोकांना हे तळमळायला लावत असेल तर तुमचं आमचं काय, बिल्डरसोबत हे काम करतात. काही विकृत लोक जाणून-बुजून याच्यामध्ये मलिदा खाण्यासाठी व्यवहारामध्ये आपली ताकद वापरून शासकीय यंत्रणा वापरून बिल्डरांच्या घशात कसे हे जाईल हा भीम प्रकाराक्रम मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
भारतीय जनता पार्टीतील चांगली लोकं माझ्यासोबत आहेत. अड्ड्यावाले ,गुत्तेवाले माझ्यासोबत नाहीत. पुण्याला वरबडायचे काम यांनी केला आहे. मला जगातल्यापाठीवरील कुठलाही व्यक्ती सांगणार नाही की तुम्ही महावीर मंदिर गहाण ठेवलं आहे त्याच्यावरती तुम्ही बोलू नका, असा दावा त्यांनी केला.
