AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : ‘घर की मुर्गी दाल बराबर बाहेरुन आलेले सावजी चिकन’, भाजपमधील इनकमिंगवर नितीन गडकरींचा खणखणीत इशारा

Nitin Gadkari on BJP Incoming : भाजपमधील इतर पक्षातून येणारे इनकमिंग काही थांबलेले नाही. त्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी पक्षाला घराचा आहेर दिला आहे. त्यांच्या नवीन विधानाने जणू कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त झाला आहे.

Nitin Gadkari : 'घर की मुर्गी दाल बराबर बाहेरुन आलेले सावजी चिकन', भाजपमधील इनकमिंगवर नितीन गडकरींचा खणखणीत इशारा
नितीन गडकरी यांचा इशारा
| Updated on: Oct 25, 2025 | 9:33 AM
Share

Nitin Gadkari Warns BJP : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठा भाऊ होण्यासाठी भाजप आसुसलेला आहे. भाजपला आता जिल्हा परिषद, महापालिकेत सर्वात अधिक जागा हव्या आहेत. त्यासाठी भाजपमध्ये विविध पक्षातून मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. या आयाराम-गयाराम संस्कृतीने पक्षाचे नुकसान होत असल्याची ओरड कालपरवाच सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी पक्षाचे कान टोचले.

‘घर की मुर्गी दाल बराबर बाहेरुन आलेले सावजी चिकन’

प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर या आयाराम-गयारामांमुळे अन्याय होत आहे. ही बाब गडकरी यांना रुचली नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी त्यांच्या भावना नागपूरमधील एका कार्यक्रमात जाहीरपणे बोलून दाखवल्या. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जपा असे त्यांनी भाजप नेतृत्वाला बजावले आहे.

‘घर की मुर्गी दाल बराबर बाहेरुन आलेले सावजी चिकन’ असा टोलाच त्यांनी या कार्यक्रमात हाणला. सावजी असल्याने बाहेरचा चिकन मसाला चांगला लागतो. पण जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा. हे जोपासलेले कार्यकर्ते आहेत. त्यांची कदर करा. त्यांना जपा. नाहीतर जेवढ्या जोराने वरच्या दिशेने जात आहात, तितक्याच झपाट्याने खाली आपटला असा खणखणीत इशारा त्यांनी भाजप नेतृत्वाला दिला. यावेळी मंचावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार सुधाकर कोहळे, डॉ. राजू पोतदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी दमदार भाषण केले. गडकरी हे त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा चंग सध्या भाजपने बांधला आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकेवर त्यांना कमळ फुलवायचे आहे. त्यासाठी भाजपमध्ये स्थानिक नेते येण्यास इच्छुक आहे. त्यांच्यासाठी भाजपने सताड दार उघडं केल्याने जुन्या जाणत्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटत आहे. सोलापूरच नाही तर अनेक ठिकाणी या इनकमिंगविरोधात स्थानिक नेते आणि कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. नेमकी हीच भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.