AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

By Election 2023 : कसबा पेठ आणि पिपंरी चिंचवड मतदारसंघातून राष्ट्रवादी उमेदवार देणार?

दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रयत्न भाजपचे आहेत. मात्र चिंचवडमधून उमेदवार देण्याचे संकेत अजित पवारांनी दिलेत. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अजित पवार रंगत आणू शकतात.

By Election 2023 : कसबा पेठ आणि पिपंरी चिंचवड मतदारसंघातून राष्ट्रवादी उमेदवार देणार?
| Updated on: Jan 21, 2023 | 11:05 PM
Share

पुणे : राज्यासह देशात अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक देशाभरात गाजली. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर मविआकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यानंतर जे जे नाट्य घडलं, ते राज्यातील जनतेने पाहिलं. ही पोटनिवडणूक गाजली ती भाजपने उमेदवार दिल्याने. राजकीय दबाव वाढल्यानंतर भाजपने उमेदवार दिला नाही.

एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यावर पोटनिवडणुकीत त्यांच्या घरातील सदस्यांना बिनविरोध निवडून देण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिलीय. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचंही नुकतंच निधन झालं. त्यामुळे राज्यात आता कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली आहे.

या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रयत्न भाजपचे आहेत. मात्र चिंचवडमधून उमेदवार देण्याचे संकेत अजित पवारांनी दिलेत. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अजित पवार रंगत आणू शकतात. तर कसबा पेठमधून काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यातल्या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीकडे सर्वच पक्षाच्या नजरा लागल्यात. भाजपचा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असला. तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी निवडणुकीच्या बाजूनं आहेत.

भाजपचा जर विचार केला तर कसबा विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळकांनाच तिकीट मिळू शकते, शैलेश टिळकांनी उमेदवारीची इच्छाही व्यक्त केलीय.

चिंचवडमधून भाजपकडून दिवंगत लक्ष्मण जगतापांचे भाऊ शंकर जगताप. तसेच लक्ष्मण जगतापांची पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची चर्चा आहे. चिंचवडमधून भाजपकडून जगतापांच्याच घरात तिकीट दिलं जाऊ शकते असं अजित पवारांनाही वाटतंय.

पण चिंचवड आणि कसब्यातून विरोधकांमधून कोण? आणि खरंच राष्ट्रवादी तसंच काँग्रेस उमेदवार देणार का? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणूक लढवावी या मागणीसाठी आग्रही आहेत. सक्षम उमेदवार द्यावा अशी मागणी करणारा ठरावच, राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पास केलाय.

यानंतर या कार्यकर्त्यांची आधी अजित पवारांचीही भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनाही भेटून चिंचवडमध्ये निवडणूक लढवावी अशी विनंती केलीय. अजित पवारांनीही उमेदवार देण्याचे संकेत दिलेत.

काँग्रेसनं कसब्याची जागा 2019च्या निवडणुकीत लढवली होती. काँग्रेसचा पराभव झाला होता. चिंचवडमध्ये अपक्ष राहुल कलाटेंना राष्ट्रवादीनं पुरस्कृत केलं होतं, कलाटेंचाही पराभव झाला होता. त्यामुळं निवडणूक लढण्याचं मविआचं ठरलंच तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी आणि कसब्याची जागा काँग्रेस लढेल असं दिसतंय. कारण पटोलेंनी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार लढणार असं म्हटलंय.

राष्ट्रवादीतून चिंचवडमध्ये आतापासूनच लॉबिंग आणि स्पर्धा सुरु झालीय. राजा का बेटा, राजा नहीं बनेगा. वहीं बनेगा जो काबील होगा. अशी इच्छुक उमेदवार नाना काटेंची पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

भाजपचा विचार केला तर, मेधा कुलकर्णींकडेही नजरा असतील. गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांसाठी तिकीट कापल्यानंतर, आता कसब्यातून त्यांना तिकीट मिळेल का ? याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नजरा आहेत. तर उमेदवारीवरुन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उघडपणे बोलत नाही आहेत.

पुणे जिल्ह्यात एकाचवेळी 2 पोटनिवडणुका जाहीर झाल्यात. पण अजित पवारांच्या म्हणण्याप्रमाणं मविआचं ठरलंच तर जोरदार रंगत येईल.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.