AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुणे शहरातील हे रस्ते आता VIP, महानगरपालिका काय करणार या रस्त्यांवर

Pune VIP roads : पुणे महानगरपालिकेला रस्त्यांवरील खड्यांवरुन वारंवार टीकेला सामोरे जावे लागत आहे. उच्च न्यायालयाने मनपाला फटकारले आहे. यानंतर आता मोठा बदल केला आहे. शहरातील रस्त्यांना व्हिआयपी दर्जा दिला आहे.

Pune News : पुणे शहरातील हे रस्ते आता VIP, महानगरपालिका काय करणार या रस्त्यांवर
Pune RaodImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 07, 2023 | 12:35 PM
Share

पुणे | 7 सप्टेंबर 2023 : दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे हा सर्वात जास्त चर्चेचा विषय असतो. रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे अनेकवेळा अपघात होत असतात. रस्त्यांवरील खड्यांवर स्थानिक नागरिकांकडूनही अनेकवेळा आंदोलन केले जाते. त्यानंतर खड्डे जसे थे राहतात. यामुळे काही दिवसांपूर्वी पुणे शहरात खड्ड्यांची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली होती. या विषयावरुन मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महानगरपलिका फटकारले होते. आता पुणे मनपाने बदल करत काही सस्त्यांना व्हिआयपी दर्जा दिला आहे.

काय आहे व्हिआयपी रस्ते संकल्पना

पुणे शहरात G-20 परिषद झाली होती. त्यावेळी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. देश-विदेशातील लोक ज्या रस्त्यांवरुन जाणार होते, ते रस्ते दुरुस्त केले गेले होते. केवळ परिषदेसाठी चांगले रस्ते ठेवल्याबद्दल पीएमसीला टीकेचा सामना करावा लागला होता. यामुळे मनपाने आता शहरातील 15 रस्ते निवडले आहे. या रस्ते व्हिआयपी रस्ते म्हणून ओळखले जाणार आहे. या रस्त्यांची दुरुस्ती आणि सुशोभिकरण वेळोवेळी करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

कोणते रस्ते आहेत व्हिआयपी

  1. नगर रस्ता पर्णकुटी चौक ते वाघोली-बकोरी फाटा रस्ता
  2. सोलापूर रस्ता वाणोरी चौक ते आकाशवाणी मांजरी चौक रस्ता
  3. मगरपट्टा चौक ते खराडी बायपास चौकापर्यंत मगरपट्टा रस्ता
  4. पाषाण रोड पुणे विद्यापीठ चौक ते पाषाण बावधन सर्कल चौक रस्ता
  5. बाणेर रस्ता पुणे विद्यापीठ चौक ते सदानंद हॉटेल चौक रस्ता
  6. संगमवाडी रस्ता सीओईएफ चौक ते पर्णकुट्टी चौकापर्यंतचा रस्ता
  7. पुणे विमानतळ ते गुंजन चौक असा विमानतळ व्हीआयपी रस्ता
  8. कर्वे रस्ता खंडोजीबाबा चौक ते वारजे चौक रस्ता
  9. पौड फाटा ते चांदी चौकापर्यंत पौड रस्ता
  10. सातारा रस्ता स्वारगेट चौक ते गुजरवाडी चौक रस्ता
  11. सिंहगड रस्ता लक्ष्मी मंदिर चौक ते नांदेड सिटी चौक रस्ता
  12. बिबवेवाडी रस्ता पुष्पमंगल चौक ते अप्पर बस डेपो चौकापर्यंत
  13. कोरेगाव पार्क पेट्रोल पंप ते ताडीगुट्टा चौकापर्यंतचा रस्ता
  14. गणेशखिंड रस्ता सीओईपी चौक ते पुणे विद्यापीठ चौकापर्यंतचा रस्ता
  15. बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता स्वारगेट चौक

असे ठेवणार रस्ते

रस्ते निवडताना शहरातील मुख्य रस्त्यांची निवड केली गेली आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशनला जोडून असणारे हे रस्ते आहेत. या रस्त्यांवर फुटपाथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यात येणार आहे. दुभाजक करुन रस्त्याचे सुशोभिकरण केले जाणार आहे. रस्त्यालगतच्या भिंतींना रंगरंगोटी करण्यात येणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.