AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तडीपार गुंडाने पोलीस अधिकाऱ्याचा गळा चिरला, हत्याकांडाने पुण्यातील बुधवार पेठ हादरली

तडीपार गुंड प्रवीण महाजनकडून (Pravin Mahajan)  फरासखाना पोलीस ठाण्यातील (Faraskhana Police Station) सहाय्यक फौजदार समीर सय्यद (Pune ASI Sameer Sayyad murder) यांची हत्या केली.

तडीपार गुंडाने पोलीस अधिकाऱ्याचा गळा चिरला, हत्याकांडाने पुण्यातील बुधवार पेठ हादरली
तडीपार गुंडाकडून पोलीस अधिकाऱ्याची हत्या
| Edited By: | Updated on: May 21, 2021 | 11:31 AM
Share

पुणे : तडीपार गुंडाने चक्क सहाय्यक फौजदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune crime news) घडली आहे. तडीपार गुंड प्रवीण महाजनकडून (Pravin Mahajan)  फरासखाना पोलीस ठाण्यातील (Faraskhana Police Station) सहाय्यक फौजदार समीर सय्यद (Pune ASI Sameer Sayyad murder) यांची हत्या केली. बुधवार पेठेतील (Budhwar Peth Pune)  श्रीकृष्ण टॉकीजवळ हे हत्याकांड झालं. मध्यरात्री 1 च्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेनंतर गुंड प्रवीण महाजनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुंडाने चक्क पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याने पुणे शहर हादरुन गेलं आहे. (Pune Police ASI Sameer Sayyad murdered by tadipar goon Pravin Mahajan near Budhwar Peth crime news today)

शिवाय या कुख्यात गुंडाचं इतकं डेअरिंग कसं काय होऊ शकतं हा प्रश्न आहे. जर एखाद्या गुंडाची पोलिसाची हत्या करण्यापर्यंत मजल जात असेल, तर पुणे पोलिसांचा वचक राहिलाय की नाही हा प्रश्न आहे.

प्रवीण महाजन या गुंडावर अनेक खटले दाखल आहेत. त्याला तडीपार करण्यात आलं आहे. मात्र त्याने काल रात्री डाव साधत पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलला. केवळ हात उचलला नाही तर त्याची मजल थेट हत्येपर्यंत पोहोचली.

नेमकं प्रकरण काय? 

सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद (वय 48) हे काल ड्युटीवर होते. रात्री ड्युटी आरोपून ते घराकडे निघाले होते. त्यावेळी गुंड प्रवीण महाजनने त्यांना बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ रात्री 1 च्या सुमारास गाठलं. तिथे त्याने सय्यद यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्रवीण महाजनने समीर सय्यद यांचा गळा चिरला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे हत्याकांड नेमकं का झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

कोण आहे गुंड प्रवीण महाजन?

  • प्रवीण महाजन हा तडीपार गुंड आहे.
  • डबल तडीपार आरोपीचा बुधवार पेठेत होता वावर
  • प्रवीण महाजनवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत

सहाय्यक फौजदार समीर सय्यद

  • समीर सय्यद हे पुणे पोलिसात कार्यरत होते
  • 48 वर्षीय समीर हे फरासखाना पोलिसात ASI होते
  • काल रात्री ड्युटीवरुन परतताना त्यांच्यावर हल्ला झाला
  • गुंड प्रवीण महाजनच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला

संबंधित बातम्या 

जी भीती होती, ती अखेर खरी ठरली!; रोहित पवारांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

मोठी बातमी: राजीव सातवांच्या प्रकृतीत सुधारणा, ऑक्सिजन लेव्हल वाढली, उपचारांना प्रतिसाद

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.