Pune corona update| पुणेकरांना अद्याप दिलासा नाहीच ! कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत इतक्या पटीने वाढला पॉझिटिव्हीटी रेट

21 जानेवारीला एका दिवसाचा पॉझिटिव्हीटी रेट तब्बल 40 टक्के नोंदवण्यात आला आहे. मात्र या तिसऱ्या लाटेत लक्षणे सौम्य असल्याने घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पहिल्या लाटेत 29.60 टक्के, दुसऱ्या लाटेत 29.70 टक्के तर तिसऱ्या लाटेत 40.80 टक्के पॉझिटिव्हीटी रेट होता.

Pune corona update|  पुणेकरांना अद्याप दिलासा नाहीच ! कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत इतक्या पटीने  वाढला पॉझिटिव्हीटी रेट
PUNE CORONA
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 11:49 AM

पुणे – राज्याच्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे पुणेकरांच्या(Pune) चिंतेत भर घालणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Third wave of the corona) कोरोनाच्या संसर्गाचा रेट पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षाही तिसऱ्या लाटेत अधिक असल्याची माहिती समोर आले आहे. शहरात तिसऱ्या लाटेतील 21 जानेवारीला एका दिवसाचा पॉझिटिव्हीटी रेट तब्बल 40 टक्के अधिक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून(Health Department)  प्राप्त झाली आहे. मात्र या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत हळूहळू घसरण होताना दिसून येत आहे.

पुण्यात तिसऱ्या लाटेत सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण शहरात तिसऱ्या लाटेत 21 जानेवारी रोजी आजवरचा उच्चाक नोंदवला गेला आहे. 21 जानेवारीला एका दिवसाचा पॉझिटिव्हीटी रेट तब्बल 40 टक्के नोंदवण्यात आला आहे. मात्र या तिसऱ्या लाटेत लक्षणे सौम्य असल्याने घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पहिल्या लाटेत 29.60 टक्के, दुसऱ्या लाटेत 29.70 टक्के तर तिसऱ्या लाटेत 40.80 टक्के पॉझिटिव्हीटी रेट होता. सद्यस्थितीत रुग्णसंख्या वाढत असली तरी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लाट ओसरण्यास सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र दरम्यानच्या काळात शहरातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं आहे.

शहारातील कोरोनाची सद्यस्थिती

सोमवारपर्यंत शहारात तब्बल 12 हजार 543  जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 3 हजार 377 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. तपासणी करण्याच्या तुलनेत ही आकडेवारी 26.92 टक्के इतकी आहे. दिवसभर 3 हजार 931  जण कोरोना मुक्त झाले आहेत. शहरात आत्तापर्यंत 42 लाख 49 हजार 507  जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 6 लाख 9 हजार 756  जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील 5  लाख 54 हजार 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 9 हजार 199 जण दगावले आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 49जणांवर इनव्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर, 27 जणांवर नॉन इनव्हेझिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. 328 जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी3. 26 टक्केच रुग्णांना रुग्णालयात उपचाराची गरज भासली आहे.

कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता

शहरातील रुग्णसंख्या वाढीचा वेग लक्षात घेऊन त्यानुसारच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती या जिल्हा व शहर प्रशासनाने दिली आहे. याबरोबरच शहरातील कोरोनाच्या निर्बंधामध्ये शिथिलथा आणता जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व शहरातील उद्याने , जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी देण्यात आली मात्र यासाठीही नियमावली घालून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील घाटात पंजाबमधील ट्रकचालकाचा कुणी केला खून? 24 तासांच्या आत पोलिसांनी लावला शोध!

पाकिस्तान दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला धक्का, दोन दिग्गज खेळाडू संघाबाहेर होण्याची शक्यता

महागाईच्या प्रश्नावर अमेरिका राष्ट्राध्यक्षांचा सुटला ताबा, पत्रकाराला शिवीगाळ, व्हाईट हाऊसमधील प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.